शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरी नसलेल्या २४ लाखांचा देयकाचा प्रस्ताव शासनाकडे

By admin | Updated: March 22, 2017 02:40 IST

घोळ निस्तारण्यासाठी बांधकाम विभागाचा पवित्रा; शासनाच्या फसवणुकीसोबतच मजुरांना त्रास.

अकोला, दि. २१- मजुरांना हजेरीपत्रकावर घेण्यासोबतच फरकाची रक्कम देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा सोयीचा अर्थ लावत शासनाच्या मंजुरीशिवायच २४ लाखांचे देयक कोषागारातून काढण्यात आले. हा घोळ दुरुस्तीसाठी आता शासनाने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव बांधकाम विभागाने २१ मार्च रोजी विभागीय आयुक्तांकडे पाठविला. विशेष म्हणजे, हा घोळ ह्यलोकमतह्णने १ फेब्रुवारी रोजी उघड केला होता. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अकोला उपविभागातील दोन मजुरांना हजेरीपत्रकावर घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्या आदेशाचा सोयीप्रमाणे अर्थ लावत त्यांना वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा प्रस्ताव तयार झाला. त्यासाठी तब्बल २४ लाख रुपयांच्या फरकाच्या रकमेचे देयक तयार झाले. त्या देयकाची तपासणी कार्यकारी अभियंता कार्यालयात शृंगारे नामक कर्मचार्‍याने केली. तत्कालीन कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर यांनीही मंजुरी दिली. प्रस्ताव थेट मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांच्याकडे पोहोचला. अर्थ विभागाने देयकाची रक्कम मिळण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात पोहोचला. कोषागार कार्यालयातून देयकापोटी २४ लाख रुपये जिल्हा परिषदेला वळतेही करण्यात आले. त्यातून संबंधित मजुरांच्या नावे धनादेश तयार झाले; मात्र २४ लाखांचे देयक अदा करण्यासाठी शासनाची मंजुरीच नाही, हा प्रकार शेवटच्या टप्प्यात उघड झाला. याप्रकरणी मोठी अनियमितता झाल्याने मजुरांचे धनादेशच थांबविण्यात आले. त्यामध्ये बांधकाम आणि अर्थ विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी जाणीवपूर्वक केलेल्या गोंधळाने मजुरांना नाहक त्रास सहन करण्यासोबतच शासनाची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. त्याबाबत ह्यलोकमतह्णने वृत्त प्रसिद्ध केले. त्यावेळी देयक अदा करण्यापूर्वी शासनाची मंजुरी का घेतली नाही, याची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्याकडे फाइल पाठविली. त्यांच्या तपासणीमध्ये प्रस्तावाला शासनाची मंजुरी असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या दोन मजुरांना अदा करावयाच्या देयकाला शासनाला मंजुरीसाठी पाठविण्याचा प्रस्ताव नव्याने तयार करण्यात आला. तो आयुक्तांकडे मंगळवारी पाठविण्यात आला.