शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी, प्रशासनाचे कान, नाक, डोळे बंद!

By admin | Updated: December 19, 2014 01:48 IST

पथानाट्याद्वारे अकोला येथील शिक्षकांनी केला निषेध.

अकोला: कार्यरत शिक्षकांसह सेवानवृत्त शिक्षकांचे मागील आठ महिन्यांचे वेतन थकीत असून, शिक्षक संघटनांनी १0 डिसेंबरपासून सुरू केलेल्या आंदोलनाची सत्ताधार्‍यांसह प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. यामुळे प्रशासन व सत्ताधार्‍यांनी कान, नाक व डोळे बंद केल्याचा देखावा शिक्षकांनी पथनाट्याद्वारे सादर केला. शिक्षकांचे पथनाट्य पाहण्यासाठी गुरुवारी सायंकाळी मनपात चांगलीच गर्दी जमली होती. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे गिरवणार्‍या मनपा शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. प्रशासनाने मागील आठ महिन्यांपासून वेतनापोटी एक छदामही अदा केले नसल्याची वस्तुस्थिती आहे. शिक्षण उपसंचालकांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे मनपा शिक्षकांचे मे व जून महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले. जोपर्यंत वेतनाचा उर्वरित ५0 टक्के हिस्सा मनपाकडून जमा होत नाही, तोपर्यंत शिक्षकांना पुढील वेतनाचा टप्पा मिळणार नसल्याचे शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याकडे मागणी करण्यात आली. मात्र आजपर्यंत तोंडी आश्‍वासनाशिवाय पदरात काहीही मिळाले नसल्याचा आरोप करीत शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. १0 डिसेंबरपासून सुरू असलेल्या विविध आंदोलनाच्या मार्गाने शिक्षकांनी प्रशासन व सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. प्रशासन व सत्ताधार्‍यांनी कान, नाक व डोळे बंद केल्याचा देखावा शिक्षकांनी पथनाट्याद्वारे सादर केला. पथनाट्याचे सादरीकरण गमतीदार व रंजकपणे करण्यात आले. पथनाट्य पाहण्यासाठी मनपा आवारात चांगलीच गर्दी जमली होती. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष कैलाश नागे, सचिव हरिश्‍चंद्र इटकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय शिरेकर, सचिव गोकुल यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.