शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

गोरसेना व विमुक्त जमातीच्या सकल संघटनांनी अकोल्यात केले रास्ता रोको आंदोलन

By atul.jaiswal | Updated: January 17, 2024 18:25 IST

या आंदोलनात तांड्यातील बंजारा सह इतर विमुक्त जमातीच्या महिला व पुरुष व महिला मोठया संख्येनी सहभागी झाले होते.

अकोला : बंजारासह १४ विमुक्त जमातीचे खोटे जातवैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व घेणाऱ्या लाभार्थीवर कारवाई होण्यासाठी एसआयटी मार्फत चौकशी करावी, २०१७ चा रक्तनाते संबंधीत शासन निर्णय रद्द करावा, खरे राजपूत भामटा जातीचे लोक महाराष्ट्रात प्रत्यक्षात कुठे राहतात याची तालुका निहाय जिल्हा यादी शासनाने त्वरित प्रकाशित करावी, तसेच नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करावी या चार प्रमुख मागण्यांसाठी गोरसेना व विमुक्त जमातीच्या सकल संघटनांच्यावतीने बुधवार, १७ जानेवारी रोजी येथील नेहरु पार्क चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून उच्चवर्णीय समाजातील अनेकांनी जात व आडनाव सादृश्याचा फायदा घेत विमुक्त जमातीचे खोटे जातप्रमाण पत्र घेऊन आरक्षित नोकऱ्या बळकावल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर १४ जातीच्या गरीब लोकांनी जात वैधता प्रमाणपत्र समिती, महासंचालक बार्टी, पुणे, व शासनाकडे तक्रारी करणे सुरु केले. याकडे शासनाचे लक्ष वेधावे म्हणून निवेदने, वेगवेगळी आंदोलने करण्यात आली, परंतु त्यानंतरही पात्र नसलेल्यांनाही जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबली नाही. यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे अखेर बंजारासह १४ विमुक्त जमातींनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती यावेळी अकोला महिला आघाडी अध्यक्षा संध्या राठोड यांनी दिली. प्रा.अनिल राठोड, मनोहर राठोड, कुलदीप चव्हाण व आतिष राठोड यांनीही या मोर्चाला संबोधित केले. या आंदोलनात तांड्यातील बंजारा सह इतर विमुक्त जमातीच्या महिला व पुरुष व महिला मोठया संख्येनी सहभागी झाले होते.

बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही - प्रा. संदेश चव्हाणबंजारासह १४ विमुक्त जमातीची आरक्षणरुपी चोरी गेलेली संपत्ती वापस मिळेपर्यंत बंजारा समाज आता स्वस्थ बसणार नाही असा इशारा प्रा. संदेश चव्हाण यांनी मोर्चाला संबोधित करताना दिला.  विमुक्त जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता १९६१ च्या आधीचा जात पुरावा बंधनकारक असताना, अनेक धनदांडगे पैश्याचा जोरावर खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Akolaअकोला