शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षण रोड : मालमत्ताधारकांना मनपाने बजावल्या नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:56 IST

अकोला : गोरक्षण रस्त्यावरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने या मार्गावरील मालमत्तांचे मोजमाप केले. प्रशासनाच्यावतीने संबंधित मालमत्ताधारकांना नोटिस पाठविण्यात आल्या असून, न्यायालयात ‘कॅवेट’ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्दे मनपाकडून न्यायालयात ‘कॅवेट’ दाखल‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिकेने केले मोजमाप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रस्त्यावरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने या मार्गावरील मालमत्तांचे मोजमाप केले. प्रशासनाच्यावतीने संबंधित मालमत्ताधारकांना नोटिस पाठविण्यात आल्या असून, न्यायालयात ‘कॅवेट’ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. शहरातील प्रमुख रस्ते टिकाऊ आणि दज्रेदार व्हावेत, यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांच्या निधीतून नेहरू पार्क चौक ते तुकाराम चौकापर्यंत सिमेंट रस्ता प्रस्तावित करण्यात आला. रस्ते दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होत आहेत. नेहरू पार्क ते तुकाराम चौकापर्यंंतचा रस्ता १५ मीटर रुंद केला जाणार आहे. अशा स्थितीत गोरक्षण रोडवरील महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंत हा रस्ता केवळ ११ मीटर रुंद केला जात आहे. इन्कम टॅक्स चौकातील इमारतींमुळे रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण झाला असून, या ठिकाणी ‘बॉटल नेक’ तयार होण्याची शक्यता आहे. संबंधित इमारतींना हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होत असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र रस्त्याचे निर्माण कार्य सुरू ठेवल्याचे दिसून येते. यादरम्यान, मनपा प्रशासनाने महापारेषण कार्यालय ते थेट लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंतच्या मालमत्तांचे मोजमाप केले असता मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकाम झाल्याचे समोर आले आहे. सदर अवैध बांधकाम पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मालमत्ताधारकांना नोटिस जारी केल्या असून, न्यायालयात ‘कॅवेट’ दाखल करण्यात आला आहे.

म्हणे नियमानुसार बांधकाम!इन्कम टॅक्स चौकात बड्या बांधकाम व्यावसायिकांची वाणिज्य संकु ले आहेत. मनपाच्या नगररचना विभागाने मंजूर केलेल्या नकाशानुसारच इमारतींचे बांधकाम केल्याचा दावा संबंधित बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. प्रत्यक्षात मनपाच्या मोजमापात मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकाम झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून मनपा प्रशासनावर राजकीय दबावतंत्राचा वापर होण्याची शक्यता आहे. या दबावतंत्रासमोर प्रशासन झुकते का, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.