शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Good News...मुलींच्या जन्मदरात अकोला राज्यात तिसऱ्या स्थानी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 10:12 IST

Akola ranks third in birth rate of girls राज्यात मुलींच्या जन्मदरात सर्वाधिक वृद्धी हिंगोली जिल्ह्यात झाली.

ठळक मुद्देपहिल्या स्थानी हिंगोली, तर दुसऱ्या स्थानी सोलापूरअकोल्यात २०१८-१९ मध्ये एक हजार मुलांमागे ९२४ मुली जन्मल्या होत्या.

अकाेला : मुलांच्या तुलनेत कमी असलेला मुलींचा जन्मदर हा गत काही वर्षांपासून चिंतेचा विषय ठरत आहे. हा दर वाढविण्यासाठी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ यासह विविध उपक्रम शासन स्तरावर राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमातून देशभरात मुलींच्या जन्मदरात सुधारणा होत आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीनुसार, राज्यातही मुलींच्या जन्मदरात वृद्धी होत असून, यामध्ये अकोला राज्यात तिसऱ्या स्थानी असल्याची माहिती समोर आली आहे.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुलींच्या जन्मदराविषयी आवश्यक सर्वच नोंदी दरवर्षी आरोग्य मंत्रालयामार्फत केल्या जातात. याच संदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या एका अहवालानुसार, २०१८-१९ च्या तुलनेत राज्यातील मुलींच्या जन्मदरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय पातळीवर विचार केल्यास २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० या वर्षभरात फारशी सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही, मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात मुलींच्या जन्मदरात सर्वाधिक वृद्धी हिंगोली जिल्ह्यात झाली. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ९०१ मुलींचा जन्म झाला होता, २०१९-२० या वर्षभरात मुलींचा जन्मदर ४७ ने वाढून तो हजार मुलांमागे ९४८ असा झाला. राज्यात दुसऱ्या स्थानी सोलापूर जिल्हा असून, तिसऱ्या स्थानी अकोला जिल्ह्याचा क्रमांक लागतो. अकोल्यात २०१८-१९ मध्ये एक हजार मुलांमागे ९२४ मुली जन्मल्या होत्या.  

 

अशी आहे राज्याची स्थिती

जिल्हा - २०१८-१९ - २०१९-२० - मुलींच्या जन्मदरात झालेली वाढ

हिंगोली - ९०१ - ९४८ - ४७

सोलापूर - ८९३ - ९२८ - ३५

अकोला - ९२४ - ९५६ - ३२

उस्मानाबाद - ९०२ - ९२८ - २६

अमरावती - ९२६ - ९५२ - २६

धुळे - ९०३ - ९२८ - २५

यवतमाळ - ९५४ - ९७८ - २४

नाशिक - ९१४ - ९३४ - २०

ठाणे - ९६० - ९७९ - १९

लातूर - ९२२ - ९३८ - १६

टॅग्स :Akolaअकोला