शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ‘गुड मॉर्निंग’ पथक सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:28 IST

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग पथक सक्रिय झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय निर्मितीची मोहीम राबवण्यात आली. बेसलाइन सर्व्हेमध्ये नाव नसल्याने अनेक गावातील कुटुंब वंचित आहेत. आता सर्वच गावांतील शिल्लक राहिलेल्या लाभार्थींनी तातडीने शौचालयाच्या अनुदानाची मागणी करून ते पूर्ण करावे. ३१ डिसेंबरनंतर अनुदान बंद होणार आहे. त्याचवेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग पथक सक्रिय झाले आहे. त्यामुळे पथक केव्हाही गावात धडकण्याची शक्यता आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्याने शौचालय बांधण्यासाठी कालमर्यादा ठरवून देण्यात आली. प्रत्येक गावातील लाभार्थींचे सर्वेक्षण करून त्यासाठी ३,८०० शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर शौचालय निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणात किती लाभार्थी शौचालय बांधण्यास तयार आहेत, त्याची यादी तयार झाली.लाभार्थीनिहाय निर्माण गट जोडण्यात आले. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना फॉर्म देऊन युनियन बँकेकडून कर्ज घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली. शौचालय बांधण्यास तयार नसलेल्या लाभार्थींना नरेगामधून बांधकाम करणे, रोजगार सेवकासोबत समन्वय ठेवून काम करावे, ३८०० शौचालयांची निर्मिती कोणत्याही परिस्थितीत करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. आता शौचालयांसाठी मिळणारा निधी ३१ डिसेंबरनंतर बंद होणार आहे. त्यामुळे ज्यांना शौचालय बांधकाम करावयाचे आहे, त्यांनी निर्मितीसाठी पुढे यावे.बेसलाइन सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करणे, त्यापैकी वैयक्तिक शौचालय नसलेल्या सर्व कुटुंबांना शौचालय बांधकामाचा परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले. त्याचा लाभ वंचित असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्याशिवाय, आता उघड्यावर शौचास जाणाºयाविरुद्ध धडक कारवाई केली जात आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पथक पुन्हा सक्रिय केल्याचे स्वच्छ भारत मिशन कक्षाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद