शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांसाठी ‘अच्छे दिन’?

By admin | Updated: January 13, 2015 01:27 IST

४ कोटीच्या निधीतून समान वाटपाच्या प्रस्तावासाठी प्रयत्न.

अकोला - महापालिकेला विकास कामांसाठी मिळालेल्या ४ कोटी रुपयांच्या निधीतून सर्व नगरसेवकांना समान वाटप करण्याचा प्रस्ताव एका ज्येष्ठ नगरसेवकाकडून ठेवण्यात आला. विशेष म्हणजे हा निधी भारिप-बमसं आणि काँग्रेसची महापालिकेत सत्ता असताना विकास कामांसाठी आरक्षित करून ठेवण्यात आला होता. यात वाटा मिळावा म्हणून आता काही नगरसेवकांनी समान वाटपाच्या प्रस्तावासाठी आटापीटा सुरू केला असल्याची माहिती आहे. अकोला शहरातील प्रमुख मार्गांसह सर्वत्र अतिक्रमणाचा विखळा होता. हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांनी धडक मोहीम राबविली. एकीकडे अतिक्रमण काढले जात असताना दुसरीकडे मात्र अतिक्रमणाची समस्या वाढतच होती. अतिक्रमण काढलेल्या जागेवर विकास कामे व्हावी यासाठी मनपा प्रशासनाने निधीची जुडवा-जुडव सुरू केली होती. प्रशासनाच्या प्रयत्नाला यश आले आणि भारिप-बमसं व काँग्रेसची महापालिकेत सत्ता असताना ४ कोटी रुपयांचा निधी त्यासाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव मनपा सभागृहात मंजूर करण्यात आला. या निधीतून शहरातील जवाहर नगर चौक ते शासकीय दूध डेअरी, घोडदौड रस्ता आणि गोरक्षण रोडवरील अतिक्रमण काढून या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव या निधीतून ठेवण्यात आला होता. ही योजना मात्र काही ज्येष्ठ नगरसेवकांच्या पचणी पडली नाही. निधीतून आपल्याला वाट्याला काही येणार नाही आणि विकास कामांचे श्रेयही लाटता येणार नाही, याची जाणीव झालेल्या या ज्येष्ठ नगरसेवकांनी आता ४ कोटीच्या निधीतून सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात समान वाटप करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर सर्व नगरसेवकांकडून मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवाय हा प्रस्ताव महापालिकेच्या आगामी सभेत ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचा प्रस्ताव असला तरी सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा या प्रस्तावाला विरोध असल्यामुळे सभेत प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे