शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

काळविटाच्या शिंगांसह सागवान जप्त

By admin | Updated: July 3, 2014 20:28 IST

माजी सैनिकास न्यायालयीन कोठडी

आकोट: आकोट वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्र असलेल्या जंगलामधून सागवान वनसंपत्तीची तस्करी करणार्‍या माजी सैनिकाला वनविभागाच्या भरारी पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याजवळून काळविटाच्या ६ शिंगांसह सागवान जप्त करण्यात आले आहे. या आरोपी माजी सैनिकावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता १० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.आकोट वन्यजीव विभागात माजी सैनिकांना वनरक्षणाकरिता ठेवण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील शेख इसराईल शेख इस्माईल (वय ५३) या माजी सैनिकाला बोरव्हा परिसरात ठेवण्यात आले होते; परंतु आरोपी शेख इसराईल शेख इस्माईल हा सागवानची तस्करी करीत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. अखेर २७ जूनला रात्री रेल्वेने सागवान लाकडाची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आला. आरोपी हा आकोटला रेल्वेने वनसंपत्ती आणून मालवाहू वाहनाने अंजनगाव सुर्जी येथे आपल्या घरी नेत असल्याचे उघड झाले. आरोपीजवळून घटनास्थळावर २ हजार रुपये किमतीचे सागवान व त्याच्या घरामधून काळविटाच्या ६ शिंगांसह पाच हजार रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले. सदर कारवाई उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहाय्यक उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने केली. तसेच आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश मालवीय यांनी १० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी वनविभागाचे विशेष अभियोक्ता मनीष जेस्वाणी यांनी बाजू मांडली. आकोट रेल्वेने वनसंपत्तीची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या वनतस्करीमागे अजून कोण-कोण आहेत, याचा तपास वनविभाग करीत आहे.