शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई पदकविजेत्या श्लोकची स्वर्णिम कामगिरी

By admin | Updated: January 7, 2017 22:14 IST

ग्रॅण्डमास्टर होण्याचे स्वप्न बघणारा चिमुकला श्लोक चांदराणीने लोकमत स्पोर्ट फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजविला

चांदराणी भावंडं चमकले बुद्धिबळ खेळात
नीलिमा शिंगणे-जगड, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ७ -  ग्रॅण्डमास्टर होण्याचे स्वप्न बघणारा चिमुकला श्लोक चांदराणीने लोकमत स्पोर्ट फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजविला. वयाच्या पाचव्या वर्षी २०१२ ला दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत  रौप्य पदक विजेत्या श्लोकने स्वर्णिम कामगिरी केली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा गाजविणारा दहा वर्षीय श्लोक शनिवारी इयत्ता १ ते ४ गटात विजेता ठरला. श्लोकची मोठी बहीण फोरम राष्ट्रीय बुद्धिबळपटू हिनेदेखील इयत्ता ७ ते १० मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले. चांदराणी भावंडं आज स्व. प्रभादेवी नारे क्रीडानगरीत कौतुकाचा विषय ठरली.
श्लोकने वयाच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्याने आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत त्याने द्वितीय स्थान मिळवून, अकोला जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविले. दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धा गाजवित त्याने फिडे मानांकनही प्राप्त केले. एवढ्या कमी वयात इंटरनॅशनल रेटिंग प्लेअर म्हणूनही त्याने नावलौकिक मिळविला. वयाच्या सातव्या वर्षी श्लोकने मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत तृतीय स्थान मिळविले होते. कोलकतामधील राष्ट्रीय स्पर्धाही गाजविली. आॅगस्ट २०१६ मध्ये श्लोकने जालंधर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. श्लोकने आपली मोठी बहीण राष्ट्रीय बुद्धिबळपटू फोरम हिच्यासोबत बुद्धिबळ खेळता-खेळता लहान वयातच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू म्हणून गौरव मिळविला.
. सध्या दोघेही प्रशिक्षक प्रवीण हेंड यांच्याकडे नियमित सहा ते सात तास बुद्धिबळाचा सराव करतात.लोकमत स्पोर्ट फेस्टिव्हलबद्दल बोलताना, अशाप्रकारचा क्रीडा महोत्सव सातत्याने घेतल्यास निश्चितच छोट्या शहरातून अनेक आंतररराष्ट्रीय खेळाडू तयार होतील, असे जयेश चांदराणी यांनी सांगितले.