शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता स्थापनेसाठी पुन्हा भगवी ‘युती’?

By admin | Updated: February 22, 2017 02:46 IST

जनमताचा कानोसा; भाजपला सर्वाधिक जागा

अकोला, दि. २१- महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने युती किंवा आघाडी न करता निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाणे पसंत केले. या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. ह्यलोकमतह्ण च्या दहा बातमीदारांच्या चमूने मंगळवारी दिवसभर शहरातील २0 प्रभाग पिंजून काढले. मतदानासाठी येणार्‍या मतदारांचा कानोसा घेतला असता भाजपला पहिली पसंती दर्शविण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक आहे. अकोलेकरांचा कल पाहता भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा देणारा असला तरी महापालिकेत सत्तास्थापनेच्या घडामोडी करताना भाजपला मित्र पक्षाची गरज भासणार असल्याचेही चित्र या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. महापालिका क्षेत्रातील २0 प्रभागांमधील ८0 जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळ होईपर्यंंत ५५.९१ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयास येणार असल्याचे संकेत आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाचा क्रमांक लागण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेत सुद्धा दोन विविध संस्थांनी केलेल्या ह्यएक्झीट पोलह्ण मध्ये भाजपा किंवा सेनेला बहूमत मिळणार नाही असा अंदाज वर्तविला गेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये युती झाली तर तेच सुत्र राज्यभर लागु करून अकोल्यातही युतीची गठण होऊ शकते. तसे न झाल्यास नवे राजकीय समिकरण उदयास येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अकोला महापालिक ा निवडणुकीच्या संदर्भात राज्य शासनाकडे पाठविलेल्या अहवालातसुद्धा भाजप व शिवसेनेच्या जागा वाढणार असल्याचे नमूद केल्याची माहिती आहे.दरम्यान, स्वबळावर निवडणूक लढविणार्‍या सर्वच राजकीय पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. मतदारांचा कौल आपल्यालाच मिळेल, अशी आशा पक्षाच्या नेत्यांना असली तरी मतदानाच्या नंतर मात्र पक्षपातळीवरही निकालाचा अंदाज घेतला जात आहे. कुठल्या प्रभागात कुणाचा प्रभाव राहीला, वेळेवर कोणती समिकरणे बदलली यासंदर्भात शाहनिशा करुन राजकीय पक्ष आपआपले अंदाज काढण्यात गुंग झाले आहेत.