शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’चे सुरक्षा कवच झाले बळकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:05 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय परिसराची सुरक्षा करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल (मसुब)च्या सुरक्षारक्षकांची २७ जवानांची तुकडी बुधवारी येथे दाखल झाली. यापूर्वी येथे तैनात असलेल्या ‘मसुब’चे ५२ सुरक्षारक्षक १९ सप्टेंबरपासून संघटनेच्या निर्देशाप्रमाणे संपावर गेल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर ही नवीन तुकडी दाखल झाल्याने ‘जीएमसी’ व सवरेपचार रुग्णालयाचे सुरक्षा कवच बळकट होण्यास मदतच होणार आहे.

ठळक मुद्देसुरक्षारक्षकांची नवी तुकडी तैनात महिला सुरक्षारक्षकांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय परिसराची सुरक्षा करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल (मसुब)च्या सुरक्षारक्षकांची २७ जवानांची तुकडी बुधवारी येथे दाखल झाली. यापूर्वी येथे तैनात असलेल्या ‘मसुब’चे ५२ सुरक्षारक्षक १९ सप्टेंबरपासून संघटनेच्या निर्देशाप्रमाणे संपावर गेल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर ही नवीन तुकडी दाखल झाल्याने ‘जीएमसी’ व सवरेपचार रुग्णालयाचे सुरक्षा कवच बळकट होण्यास मदतच होणार आहे. सुरक्षारक्षकांच्या संपानंतर सवरेपचार रुग्णालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय आहे.तब्बल २५ एकरांचा विस्तीर्ण परिसर, २८ इमारती व तेवढेच वॉर्ड तसेच हजारोंच्या संख्येने येणारे रुग्ण या सर्व यंत्रणेची सुरक्षा करण्यासाठी जुलै महिन्यात ‘मसुब’चे ५३ सुरक्षारक्षक येथे तैनात करण्यात आले होते. शिवाय, ‘मेस्को’ व खासगी सुरक्षारक्षकही दिमतीला आहेतच. गत महिन्यात मसुबचे सुरक्षारक्षक अचानक संपावर गेल्याने सवरेपचारची सुरक्षा कमकुवत झाली होती. दरम्यान, संपावर गेलेल्या सुरक्षारक्षकांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर बुधवारी ‘मसुब’चे २७ सुरक्षारक्षकांचे दल सवरेपचारमध्ये दाखल झाले. यामध्ये १५ महिलांचाही समावेश आहे. राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या या सुरक्षारक्षकांच्या तैनातीने सवरेपचारची सुरक्षा मजबूत होणार आहे. 

संख्या वाढणार‘जीएमसी’मध्ये पूर्वी ५२ सुरक्षारक्षक व तीन समन्वयक अशी ५५ जणांची तुकडी तैनात होती. संपानंतर आता २७ जणांची नवी तुकडी दाखल झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत उर्वरित सुरक्षारक्षकही दाखल होणार असल्याचे सवरेपचार प्रशासनाकडून सांगण्यात आले.