शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

... अखेर ‘जीएमसी’ला मिळाला ‘क्लिनिकल सायकोलॉजिस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:11 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दिव्यांग कक्षाला अखेर ‘क्लिनिकल सायकोलॉजिस्ट’ मिळाल्याने हजारो दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दिव्यांग कक्षाला अखेर ‘क्लिनिकल सायकोलॉजिस्ट’ मिळाल्याने हजारो दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. शेकडो प्रलंबित अर्ज निकाली निघणार आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांग कक्षाची स्थापना झाल्यापासून क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे पद रिक्त होते. त्यामुळे हजारो मनोविकार रुग्णांचे अर्ज तपासणीविनाच पडून आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने २५ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासन क्लिनिकल सायकोलॉजिस्टचा शोध सुरू केला; परंतु या पदासाठी पात्र तज्ज्ञच मिळत नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते. आॅनलाइन अर्ज करूनही मनोविकार रुग्णांची तपासणी होत नसल्याने त्यांना दिव्यांग प्रमाणपत्रापासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, दिव्यांग कक्षाला आठवड्यातून किमान दोन दिवस क्लिनिकल सायकोलॉजिस्ट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दिव्यांग आयुक्तांकडे करण्यात आली होती; परंतु तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे दिव्यांग आयुक्तालयाकडून सांगण्यात आले होते; मात्र हा प्रश्न जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मदतीने निकाली लागला असून, अकोल्यातच क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सापडला आहे. त्यामुळे प्रलंबित शेकडो अर्ज निकाली निघणार असून, दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.दर सोमवारी विशेष सेवादिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या मनोविकार रुग्णांची तपासणी दर सोमवारी केली जाणार आहे. पहिली विशेष सेवा सोमवार, १० जून रोजी दिली जाणार आहे. त्यानंतर दर सोमवारी ही सेवा दिली जाणार असून, शेकडो अर्ज निकाली काढण्यास मदत होईल.प्रेरणा प्रकल्पांतर्गत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कार्यरत असून, आठवड्यातून एक दिवस ते दिव्यांग कक्षाला सेवा देणार आहेत.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत कार्यरत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट दिव्यांग कक्षाला सेवा देणार आहेत. त्यामुळे प्रलंबित अर्ज निकाली लागणार आहेत.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय