शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकतेचा संदेश देत 'वन लेग वंडर' अशोक मुंडे निघाले भारत जोडो यात्रेत!

By रवी दामोदर | Updated: November 17, 2022 10:56 IST

‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेले तसेच  एव्हरेस्ट शिखर पार करणारे अशोक मुन्ने भारत जोडो यात्रेला समर्थन देत पातुर येथून यात्रेत सहभागी झाले आहेत. 

अकोला :

‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेले तसेच  एव्हरेस्ट शिखर पार करणारे अशोक मुन्ने भारत जोडो यात्रेला समर्थन देत पातुर येथून यात्रेत सहभागी झाले आहेत. देशात जातीवरून होणारे राजकारण थांबले पाहिजे, तसेच सर्वांनी एकत्र येत देशाच्या प्रगतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नसून, केवळ एकतेचा संदेश देत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले.  नागपूर वरून येत भारत जोडो यात्रेच्या ७१ व्या दिवशी ते पातूर येथून यात्रेत सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत नागपूर येथील डॉ. विजय रणदिवे, अभिजीत मानव आदी यात्रेत सहभागी होते.अपंगांमध्ये अशोक मुन्ने ठरले होते भारतातून दुसरे!आशिया खंडातून अशोक मुन्ने याच्यापूर्वी नेपाळचा सुदर्शन गौतम (२० मे २०१३) आणि भारताची अरुनिमा सिन्हा (२१ मे २०१३) या अपंग व्यक्तींनीही माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. अरुनिमानंतर एव्हरेस्टवर जाणारा भारतातील तो दुसरा असून पुरुषांमध्ये पहिला आहे. सुदर्शन गौतमने ५७३२ मीटर, अरुनिमाने ८८४८ मीटर तर अशोकने ८५०० मीटर उंच शिखर पार केले.२०१६ मध्ये केले होते शिखर पार!जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढण्याचा बेत अशोकने २०१२ मध्येच केला होता. मात्र त्यावेळी त्याचे प्रशिक्षण पूर्ण झालेले नव्हते. अपयशी न होता त्याचा संघर्ष सुरूच होता. अखेर २०१६ मध्ये त्याने एव्हरेस्ट सर करून सर्वांना आश्चर्यकारक आणि सुखद असा धक्का दिला होता.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा