शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधी पाणी द्या, नंतर सभा घ्या!

By admin | Updated: August 9, 2016 02:42 IST

अकोला मनपाच्या स्थायी समितीची सभा स्थगित : संतप्त नगरसेवकांनी केले स्थायी समितीचे काम बंद.

अकोला, दि. ८ : महान धरणात ७७.७0 टक्के जलसाठा उपलब्ध असताना महापालिका अकोलेकरांना सातव्या दिवशी पाणीपुरवठा करीत आहे. नळांना मीटर लावल्यास दररोज पाणीपुरवठा करण्याच्या गप्पा प्रशासन करीत आहे. मीटर लावण्यासाठी नगरसेवकांचा विरोध नाही. अशा स्थितीत अकोलेकरांना सातव्या दिवशी पाणीपुरवठा का,असा सवाल उपस्थित करीत जोपर्यंत नागरिकांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत स्थायी समितीचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा देत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच स्थायी समितीचे कामकाज बंद केले. त्यामुळे नाइलाजाने सभापती विजय अग्रवाल यांना सभा स्थगित करावी लागली.महापालिकेत सोमवारी स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच नागरिकांना होणार्‍या गढूळ पाणीपुरवठय़ाचा मुद्दा नगरसेवक सुरेश अंधारे यांनी उपस्थित केला. प्रभागातील ७00 घरांना गढूळ पाणीपुरवठा होत असून, जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना वारंवार सूचना करूनही कामात सुधारणा होत नसल्याचे नगरसेवक अंधारे यांनी सांगितले. पाइपलाइन गळतीची समस्या दूर करण्याची कामे सुरू असून, ही समस्या तत्काळ दूर केली जाणार असल्याचे जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी नमूद केले. धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना अकोलेकरांना सातव्या दिवशी पाणीपुरवठा होत असण्यावर नगरसेवक बाळ टाले, सतीश ढगे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत ३0 जुलै रोजी पार पडलेल्या सभेत प्रशासनाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिल्याची आठवण करून दिली. सभेत होणार्‍या निर्णयावर प्रशासन जर अंमलबजावणी करत नसेल तर सभा घेऊन उपयोग काय,असा सवाल बाळ टाले यांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रशासनाने आधी पाणीपुरवठय़ावर भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतरच स्थायी समितीचे कामकाज सुरू ठेवण्याचा आग्रह बाळ टाले, सतीश ढगे, सुरेश अंधारे, आशिष पवित्रकार, मंगला म्हैसने, रिजवाना शेख अजीज यांनी लावून धरला. नगरसेवकांच्या भावना लक्षात घेता सभापती विजय अग्रवाल यांनी स्थायी समितीची सभा स्थगित केली.