शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ातील पर्यटनाला चालना देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:22 IST

अकोला : जिल्हय़ातील पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी विमानतळाचा प्रश्न गतीने सोडवला जाईल. खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पाठपुराव्याने अकोला जिल्हय़ाचा अनुशेष पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकास केला जाईलच, असे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देराज्यमंत्री मदन येरावार भाजप कार्यालयात सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी विमानतळाचा प्रश्न गतीने सोडवला जाईल. खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पाठपुराव्याने अकोला जिल्हय़ाचा अनुशेष पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकास केला जाईलच, असे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे सांगितले.भाजप कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार शर्मा होते. अतिथी म्हणून खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष किशोर पाटील, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, डॉ. विनोद बोर्डे, धनंजय गिरधर, संजय जिरापुरे, डॉ. बाबुराव शेळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना येरावार यांनी जिल्हय़ातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी विशेष निधी दिला जाईल, तसेच विमानतळाच्या विकासासाठी निधीची मागणी खासदार, आमदारांनी केली असून, त्यासाठी लवकरच आर्थिक तरतूद केली जाईल, असेही सांगितले. असदगड, बाळापूरची छत्री, सिरसोलीची लढाई, पातूर येथील सीतान्हाणी, कापशी, माना येथील पर्यटनस्थळांना चालना देण्याची मागणी महानगर अध्यक्ष मांगटे पाटील यांनी केली. त्यानुसार राज्यमंत्री येरावार यांनी ग्वाही दिली. संचालन डॉ. विनोद बोर्डे यांनी तर आभार श्रीकृष्ण मोरखडे यांनी मानले. यावेळी रवी गावंडे, अनिल गावंडे, रामदास तायडे, चंदा शर्मा, रमण जैन, चंद्रकांत अंधारे, विलास पोटे, अनुप गोसावी, प्रा. उदय देशमुख, राहुल देशमुख, अण्णा उमाळे, नारायण पंचभाई, नीलेश निनोरे, विजय परमार, प्रतुल हातवळणे, राजेंद्र गिरी, सुमन गावंडे, डॉ. अभय जैन, हरीश आलिमचंदानी उपस्थित होते. 

अधिकार्‍यांनी कार्यतत्पर राहावे -खासदार धोत्रेलोकशाहीत विकास कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दोन चाके आहेत. लोकप्रतिनिधींना समस्यांची जाण असते, त्यामुळे विकासाच्या दृष्टीने नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी अधिकार्‍यांनी सदैव कार्यतत्पर असले पाहिजे, असे खासदार धोत्रे म्हणाले. 

दारू दुकानांसदर्भात न्याय द्या - सावरकरविमानतळासाठी लागणार्‍या जमिनीच्या संपादनाला १२९ कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, देशात सर्वाधिक दालमिल असलेला अकोला जिल्हा आहे, तसेच कापशी तलाव पर्यटनस्थळाचा विकास करावा, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नावावर महानगरातील वस्त्यांमध्ये कोठेही देशी-विदेशी दारूची दुकाने उघडणे, स्थलांतरित केली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये शासनाबद्दल रोष निर्माण होत आहे. हा प्रकार थांबवावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

शहीद गवई यांना श्रद्धांजलीजिल्हय़ातील लोणाग्रा येथील शूर सैनिक शहीद सुमेध गवई यांना कार्यक्रमापूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली.