शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पित्यासह दोन मुलांना जन्मठेप

By admin | Updated: July 1, 2014 02:22 IST

सांगवा मेळ येथील युवकाचे हत्याकांड; अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा.

अकोला: आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून सांगवा मेळ येथील युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने पित्यासह त्यांच्या दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मूर्तिजापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या सांगवा मेळ येथे राहणारे अशोक रामराव सोळंके यांनी २९ एप्रिल २0१२ रोजी रात्री दिलेल्या तक्रारीनुसार २८ एप्रिल रोजी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास त्यांचे भाऊ उमेश सोळंके यांच्यासोबत परिचित श्रीराम मोतीराम सोळंके व त्यांची मुले मोहन व संतोष सोळंके यांनी वाद घातला. दरम्यान, श्रीराम सोळंके आणि संतोष सोळंके या दोघांनी उमेशला पकडून ठेवले. आरोपी मोहन सोळंके याने जवळील चाकूने उमेशवर सपासप वार केले. उमेशला त्याच्या नातेवाइकांनी तातडीने दवाखान्यात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशोक रमेश सोळंके यांच्या तक्रारीनुसार मूर्तिजापूर पोलिसांनी तिघांही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलिसांनी हत्याकांडाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या हत्याकांडाचा तपास पीएसआय दीप्ती ब्राह्मणे यांनी केला होता. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र व न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने साक्षीदार व ठोस पुराव्यांच्या आधारे तिघाही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सोबतच ५00 रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीला जखमी केल्यावरून आरोपी मोहन सोळंके याला एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मंगला पांडे यांनी काम पाहिले.