अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला मंजूर असलेला निधी अन्य विभागाकडे वळता न करता, जिल्हा परिषदेला उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या गटनेत्यांनी पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याकडे २६ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना विकासकामांसाठी मंजूर असलेला निधी इतर कोणत्याही विभागाकडे वळता न करता, जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांना विकासकामांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेतील गटनेत्यांनी पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला मंजूर निधी व विकासकामांचे करण्यात आलेले नियोजन या मुद्यावर गटनेत्यांनी पालकमंत्र्यांसोबत चर्चाही केली. यावेळी जिल्हा परिषदेतील वंचित बहुजन आघाडीचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, काॅंग्रेसचे गटनेता सुनील धाबेकर, भाजपचे डाॅ. अमित कावरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विशाल गावंडे उपस्थित होते.
...........................फोटो.......................