शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आईची हत्या करणाऱ्या मुलीची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:17 IST

अकोला : जुन्या आरटीओ रोडवरील गिरी नगरातील स्वप्नशिल्प अपार्टमेंटमध्ये जन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या मुलीची पोलीस कोठडी संपल्याने रविवारी तिला ...

अकोला : जुन्या आरटीओ रोडवरील गिरी नगरातील स्वप्नशिल्प अपार्टमेंटमध्ये जन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या मुलीची पोलीस कोठडी संपल्याने रविवारी तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

स्वप्नशिल्प अपार्टमेंट येथे सरूबाई काशीनाथ कांडेलकर (वय ६१) या राहत होत्या. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर तीनच मुली असल्याने त्यांनी शेतीवाडी व इतर प्रॉपर्टी त्यांच्या तीनही मुलींना वाटप केली. यामधील कविता बायस्कर हिला एका शेतजमिनीतील सात गुंठे हिस्सा अधिकचा मिळाला होता. त्यामुळे सरूबाई कांडेलकर यांनी कविताला एक लाख रुपयांची मागणी केली. यावरूनच दोघींमध्ये वाद झाले. याच वादातून बुधवारी सायंकाळी कविता बायस्कर हिने आई सरूबाई कांडेलकर यांचे डोके घरातील पाट्यावर आदळून त्यांची हत्या केली होती. या हत्येनंतर कविता बावस्कर हिने किरकोळ वादातून आई जमिनीवर कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव पोलिसांसमोर केला. मात्र पोलिसांनी कविताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने एक लाख रुपयांसाठी हे हत्याकांड केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी कविताला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने तिला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने कविताची कारागृहात रवानगी केली.