पारस : नजीकच्या अडोशी-कडोशी येथील रहिवासी असलेल्या एका २० वर्षीय युवतीने ३१ आॅगस्टच्या सकाळी ८.३० वाजता स्थानिक रेल्वेस्टेशनवर धावत्या मालगाडीसमोर रेल्वेरूळावर उडी मारून जीव दिल्याची घटना घङली. सदर युवतीचे नाव किरण शिवराम साठे असून ती स्थानिक महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाच्या वर्गात शिकत होती. ती सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पारस रेल्वेस्टेशनवर प्लॅटफॉर्मवर उभी होती. रेल्वेट्रॅकवरून मालगाडी येताच तिने मालगाडीच्या समोर अचानक उडी मारली.धावत्या रेल्वेखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रेल्वेस्टेशनवर त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांना धक्काच बसला. या प्रकरणी रेल्वे पोलीस पुढील प्रक्रिया करीत आहेत.
रेल्वेखाली उडी मारून युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:58 IST