शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महान येथे गोदामासह गोठ्याला आग

By admin | Updated: April 3, 2017 20:22 IST

अचानक लागलेल्या या आगीत गोदामातील कडबा व शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाले आहे. तर गोठ्यातील बैल भाजला आहे.

महान : येथील गजानन मोतीराम सरोदे यांच्या तेलीपुरास्थित निवासस्थानामागील गोदामासह गुरांच्या गोठ्याला ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अचानक आग लागली. यात गोदामामधील कडबा व शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाली. या आगीत गोठ्यामधील एक बैल भाजला आहे. येथील गजानन मोतीराम सरोदे यांच्या निवासस्थानामागे त्यांच्या मालकीचे शेत असून, या शेतामध्ये गुरांसाठी चारा साठवण करण्यासाठी गोदाम व बैलाचा गोठा बांधलेला आहे. या गोदाम व गोठ्याला लागलेल्या आगीत कुटार, कडब्यासह शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाली. तसेच ४० हजार रुपये किमतीचा बैल आगीत भाजला गेला. यामुळे गजानन सरोदे यांचे जवळपास ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गोदाम व गोठ्याला आग लागल्याचे मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा केला. तो ऐकून तेलीपुरा, माळीपुरा येथील नागरिकांनी एकत्र येऊन आग विझविण्यास मदत केली. ही आग आटोक्यात येत नसल्याने वीज कंपनीच्या पॉवर हाउसला संपर्क करून थ्री फेजचा वीज प्र्रवाह सुरू करण्याची विनंती केली. त्यानंतर मोटार पंपाच्या मदतीने आग विझविण्यात आली. आगीमुळे अन्य कुणाच्या घराचे नुकसान झाले नाही. या आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती कळताच पटवारी गिरीधर झळके यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी आगीबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात पाठविला आहे.