शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निवारणासाठी सज्ज व्हा!

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश

अकोला : मान्सून लांबल्याने जिल्ह्यातील पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी दिले. पाऊस लांबल्याच्या स्थितीत पर्यायी पेरणीसाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा सुरू होऊन, महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच धरणांमधील जलसाठादेखील कमी होत असल्याने, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर आणखी काही दिवस पाऊस न आल्यास निर्माण होणार्‍या टंचाई परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. येत्या १0 जुलैपर्यंत पाऊस न आल्यास तालुका स्तरावर बैठका घेऊन, तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांनी पाणीटंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांनी पुढील तीन महिन्यांचा उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. तसेच चाराटंचाईसंदर्भात माहिती घेऊन त्यासंदर्भात उपाययोजनांची कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच वैरण विकास आणि भरड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत चारा निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकार्‍यांना या बैठकीत देण्यात आले. पावसाअभावी जिल्ह्यात खोळंबलेल्या खरीप पेरण्या, धरणांमधील उपलब्ध जलसाठा, उपलब्ध चारा या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. पावसाचा पत्ता नसल्याने आता मूग, उडीद ही खरीप पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे २0 जुलैपर्यंत पाऊस आल्यास सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी इत्यादी खरीप पिके घेता येतील, अशी माहिती कृषी विभागामार्फत या बैठकीत देण्यात आली. त्यानुषंगाने पाऊस आल्यास पर्यायी पीक पेरणीबाबत शेतकर्‍यांना माहिती देऊन, जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिले. या आढावा बैठकीला मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पशुसंवर्धन अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.