शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आधार प्रमाणीकरण तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:45 IST

यासंदर्भात दिलेल्या माहिती पत्रकात म्हटले आहे की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१५ ते ...

यासंदर्भात दिलेल्या माहिती पत्रकात म्हटले आहे की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व दि. ३० सप्टेंबर २०१९पर्यंत व्याजासह दोन लाखांपर्यंत थकीत कर्जाची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यावर शासनामार्फत वर्ग करण्यात येते.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९अंतर्गत यापूर्वी विशिष्ट क्रमांकासह कर्ज खाती सहा याद्या आधार प्रमाणीकरणासाठी ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त झालेल्या आहेत. तसेच १ जानेवारी रोजी विशिष्ट क्रमांकासह सातवी यादी आधार प्रमाणीकरणासाठी ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त झालेली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची प्राप्त झालेली नवीन यादी बँकेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सर्व जिल्ह्यांतील लाभार्थी यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेल्या या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले संबंधित बँकेशी संपर्क साधून आपले नाव सातव्या यादीमध्ये आलेले असल्यास जवळच्या सी.एस.सी. किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

आधार प्रमाणीकरण संदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या बॅंकेचे शाखा व्यवस्थापक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तालुका उपसहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.