शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ३ हजार ३00 वृक्षांचे ‘जिओ टॅगिंग’

By admin | Updated: July 2, 2016 02:10 IST

अकोला महापालिकेचा दावा;प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फुर्त सहभाग.

अकोला:पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय असून त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात वृक्षारोपणाची मोहिम राबवण्यात आली. प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी शहराच्या विविध भागात ३ हजार ३00 वृक्षांची लागवड करण्यात आली असून ह्यजीपीएसह्ण प्रणालीद्वारे 'जिओ टॅगिंग'करून त्यांची नोंद घेण्यात आली.झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. जंगले नष्ट होत असतानाच त्यातुलनेत वृक्षारोपण होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. ही बाब केंद्रासह राज्य शासनाने गंभीरतेने घेत १ जुलै ते ७ जुलै पर्यंंत वृक्ष लागवड मोहिम व्यापक प्रमाणात राबवण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. महापालिका प्रशासनाने समाजसेवी संस्था, मनपा शाळांचे शिक्षक,कर्मचार्‍यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांना वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे शुक्रवारी शहरात पहावयास मिळाले. प्रशासनाने शहराच्या विविध भागात ५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवले होते. राजकीय पदाधिकारी,नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, मनपा शिक्षकांना देण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाची ह्यजीपीएसह्णप्रणालीद्वारे ह्यजिओ टॅगिंगह्णकरून नोंद घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून होत आहे. ही नोंद संगणकीकृत करून छायाचित्रांसह त्याची माहिती शासनाच्या वेबसाईटवर ह्यअपलोडह्णकरण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरु झाले आहे. आता वृक्ष जगवण्याचे आव्हानवृक्षारोपण केल्यानंतर त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी अकोलेकर या नात्याने सर्वांंवरच आहे. तरच वृक्ष लागवडीची मोहिम खर्‍या अर्थाने सार्थकी लागेल. यापूर्वीचा वृक्ष लागवडीचा अनुभव पाहता, केवळ तीन ते चार टक्के वृक्षांचे संगोपन होत असल्याचे दिसून येते.वृक्ष लागवडीची होणार तपासणीमहापालिकेने स्वयंसेवी संस्था, पालिका शिक्षकांसह नगरसेवकांना वाटप केलेल्या वृक्षांची लागवड केली किंवा नाही,याची तपासणी होणार आहे. तपासणीसाठी शासनस्तरावरून पथकाचे गठन केले जाणार असल्याची माहिती आहे.