सचिन राऊत, दीपक अग्रवाल अकोला/मूर्तिजापूर
बांबू कापणे, त्याचा गठ्ठा बांधणे, त्यापासून फर्निचर तयार करणे, अशा प्रकारचा आ पला पिढीजात व्यवसाय करीत असतानाच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे हरिष पिंपळे हे विधानसभेच्या मूर्तिजापूर मतदारसंघातून दुसर्यांदा विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचे आंदोलन असो किंवा कुठला नेता येवो, त्यांच्या स्वागताच्या कमानी बांधणे, रस्त्यावर फलक लावणे, झेंडे बांधण्याचे काम करणारा एक सच्चा अन् सामान्य कार्यकर्ता तसेच प्रत्येकाला आपलासा वाटणारा अशी ओळख हरीश पिंपळे यांनी निर्माण झाली आहे. हरीश पिंपळे यांच्या आजोबापासून बांबू कापणे, गठ्ठा बांधण्यासह विविध फर्निचर तयार करण्याचा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. हरीश पिंपळे इयत्ता ५ व्या वर्गात शिकत अस ताना ते जमेल तेवढी समाजसेवा करीत होते. पुढे त्यांनी आपला हा व्यवसाय सांभाळून राजकारणालाही सुरुवात केली.
व्यवसाय करीत असतानाच ते भाजपमध्ये सक्रिय होतेच. विधानसभेचा मूर्तिजापूर मतदारसंघ राखीव झाल्याने २00९च्या निवडणुकीत त्यांना रिंगणात उतरण्याची संधी मिळाली. त्यांनी संधीचे सोने करुन दाखविले. ते पहिल्यांदाच आमदारस म्हणून निवडून आले. मूर्तिजापूर शहरवासीयांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न मार्गी लावून आपली छाप उमटविली. मतदारसंघापुरतेच र्मयादित न राहता त्यांनी गरिबांसाठी काम सुरू केले. १५ वेळा रक्तदान केलेल्या पिंपळे यांना शासकीय आरोग्य सेवेच्या गोंधळ कारभाराची माहिती होतीच. त्यामुळे त्यांनी सवरेपचार रुग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशिनसाठी आंदोलनाचा लढा उभारला. गरिबांना विद्युत कनेक्शन तातडीने मिळावे, यासाठी वीज वितरण कंपनीविरोधात दंड थोपटले. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांना २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा संधी दिली. त्यांना मतदारांनी आपली पहिली पसंती देत सलग दुसर्यांदा विधानसभेत पाठविले. अडचणींमध्ये संधी शोधल्यास यश हमखास पदरात पडते, हेच पिंपळे यांच्या संघर्षमय जीवनाकडे पाहिल्यानंतर दिसून येते, एवढे मात्र निश्चित.!