शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवकांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 16:56 IST

अकोला : अकोला महापालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा व गजानन चव्हाण यांनी ‘अमृत’ योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत गोंधळ घातला.

अकोला : अकोला महापालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा व गजानन चव्हाण यांनी ‘अमृत’ योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत गोंधळ घातला. यावेळी गोंधळी सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या दिल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात येऊन गोंधळी सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.अमृत योजनेवर चर्चा करण्याचे आश्वासन महापौरांनी मागच्या सभेत दिल्यानंतरही शुक्रवारी पार पडलेल्या सभेत चर्चा घेण्यात आली नाही. मागच्य सभेतच चर्चा झाल्याने या सभेत चर्चा घेण्यात येणार नसल्याचे महापौरांनी सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व इतर सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला; परंतु गोंधळी सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.यावेळी त्यांनी महापौरांशी वाद घालत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला तसेच माईकही तोडला. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवित राजेश मिश्रा यांना बाजूला ओढले, तर महापौरांनीही राजदंड घट्ट पकडून ठेवला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या दोन्ही सदस्यांना सभागृहाबाहेर नेले. या प्रकारानंतर दोन्ही नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पुढे सुरु करण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका