शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत गाजला हरभरा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:27 IST

अकोला : हरभरा बियाणे वाटपातील घोटाळ्यासह रखडलेले पुस्तकांचे वाटप, वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा बुधवारी चांगलीच गाजली. दलित वस्ती योजनेंतर्गत वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर बाळापूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता वामन राठोड यांची वेतनवाढ रोखण्यासाठी नस्ती (फाइल) सादर करून कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश सभेत देण्यात आला.

ठळक मुद्देपुस्तक वाटपाच्या मुद्यावरही गदारोळ बाळापूरच्या कनिष्ठ अभियंत्याची वेतनवाढ रोखण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हरभरा बियाणे वाटपातील घोटाळ्यासह रखडलेले पुस्तकांचे वाटप, वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा बुधवारी चांगलीच गाजली. दलित वस्ती योजनेंतर्गत वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर बाळापूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता वामन राठोड यांची वेतनवाढ रोखण्यासाठी नस्ती (फाइल) सादर करून कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश सभेत देण्यात आला.हरभरा बियाणे वाटपातील घोटाळा प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या १४२ कृषी सेवा केंद्रांपैकी किती कृषी सेवा केंद्रांवर सुनावणी झाली, याबाबत सदस्य गोपाल कोल्हे यांनी विचारणा केली. त्यावर कृषी सेवा केंद्रांच्या सुनावणीची प्रक्रिया सुरू असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारवाईच्या दृष्टीने निर्णय घेता येत नसल्याचे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी सभागृहात सांगितले. कृषी विकास अधिकार्‍यांच्या या उत्तरावर सदस्य कोल्हे यांनी ‘मग सुनावणीच कशाला घेता’, असा सवाल केला. कृषी सेवा केंद्रांच्या सुनावणीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याच्या मुद्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप योजनेंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके मिळाली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा प्रश्न सदस्य डॉ.हिंमत घाटोळ यांनी उपस्थित केला. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कृती आराखड्यात नसताना वाडेगाव येथील रस्त्याचे काम मंजूर ठिकाणी न करता दुसर्‍या ठिकाणी करण्यात आले आणि या रस्ता कामाच्या भूमिपूजनाला मी उपस्थित नसताना छायाचित्रात मात्र मी उपस्थित असल्याचे दाखविण्यात आले. यासंदर्भात संबंधित कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सदस्य डॉ.घाटोळ यांनी केली. तसेच सस्ती येथील आरोग्य केंद्रांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा मुद्दा सदस्य शोभा शेळके यांनी उपस्थित केला. या पृष्ठभूमीवर बाळापूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता वामन राठोड यांची वेतनवाढ रोखण्यासाठी ‘फाइल’ सादर करून कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले. जिल्हय़ातील पाणीटंचाईच्या मुद्यावर या सभेत चर्चा करण्यात आली. 

अनुपालन अहवालात सविस्तर खुलासा द्या!समितीच्या सभेत सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांचा संबंधित विभागांनी सविस्तर खुलासा दिला पाहिजे, अशी मागणी सदस्य विजय लव्हाळे यांनी सभेत केली, तर सर्वशिक्षा अभियानांतर्गत स्वयंपाक खोली बांधकामासाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाची चौकशी करण्याची मागणी सदस्य डॉ.हिंमत घाटोळ यांनी केली.

‘बारुल्या’तील गावांना उगवापासून पाणीपुरवठा करा!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला, तरी ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी उगवापर्यंत आहे. तेथून जलवाहिनीद्वारे बारुला विभागातील गावांना पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्य शोभा शेळके यांनी सभेत केली.