शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गावतलावाचे केले शेततळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:49 IST

अकोला : कधी काळी गावाची तहान भागवणार्‍या ब्रिटिशकालीन गावतलावाची थेट शेततळे म्हणून नोंद करण्याचा प्रकार खारपाणपट्टय़ात असलेल्या अकोला तालुक्यातील लाखोंडा बुद्रूक गावात घडला आहे. विशेष म्हणजे, मंडळ अधिकार्‍याने संबंधित शेतकर्‍याचे प्रतिज्ञापत्र आणि तलाठय़ाच्या सांगण्यावरून ही नोंद प्रमाणित केल्याचे म्हटल्याने या प्रकारातील काळेबेरे उघड होत आहे. याबाबतची तक्रारही पंचायत समिती सदस्य रुपाली सतीश गोपनारायण यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

ठळक मुद्देलाखोंडा गावातील प्रकार तलाठी, मंडळ अधिकार्‍यांचे संगनमत

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कधी काळी गावाची तहान भागवणार्‍या ब्रिटिशकालीन गावतलावाची थेट शेततळे म्हणून नोंद करण्याचा प्रकार खारपाणपट्टय़ात असलेल्या अकोला तालुक्यातील लाखोंडा बुद्रूक गावात घडला आहे. विशेष म्हणजे, मंडळ अधिकार्‍याने संबंधित शेतकर्‍याचे प्रतिज्ञापत्र आणि तलाठय़ाच्या सांगण्यावरून ही नोंद प्रमाणित केल्याचे म्हटल्याने या प्रकारातील काळेबेरे उघड होत आहे. याबाबतची तक्रारही पंचायत समिती सदस्य रुपाली सतीश गोपनारायण यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.खारपाणपट्टय़ात असल्याने गावाला तलावातून पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी ब्रिटिश काळापासून ९0 गुंठे क्षेत्रात गावतलाव तयार करण्यात आला. तेव्हापासून वर्षानुवर्षे ग्रामस्थांनी या तलावातील पाण्याचा वापर केला आहे; मात्र या गावतलावाच्या जमिनीवर गावातील राधाकिसन घावट यांनी अतिक्रमण केले. तलावाची एक बाजू सपाट केली. तलावात वाहून येणार्‍या पाण्याचा मार्ग बंद केला. त्या जमिनीचा वापर कसण्यासाठी सुरू केला. त्यावर कळस म्हणजे, २0११ मध्ये सपाटीकरण केलेल्या जमिनीच्या भागाची शेततळे म्हणून नोंदही करून घेतली. तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी १५ जून २0११ रोजी ही नोंद प्रमाणित केली. या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती रुपाली गोपनारायण यांनी तक्रारीत दिली आहे. 

तलाठय़ाच्या तोंडी सांगण्यावरून झाली नोंदघावट यांनी अध्र्या एकराच्या क्षेत्रात केलेले शेततळे कोणत्या यंत्रणेने करून दिले, त्याचा मंजुरी आदेश, काम पूर्णत्वाचे पत्र यापैकी कोणताही कागद तलाठी, मंडळ अधिकार्‍यांना दिला नाही. केवळ स्वयंप्रतिज्ञापत्राद्वारे नोंदीची मागणी केली. त्यावर मंडळ अधिकार्‍यांनी तलाठय़ाने शेततळे असल्याचे तोंडी सांगितल्यावरून नोंद प्रमाणित केल्याचे म्हटले. हा प्रकार शेततळ्य़ाची सत्यता उघड करणारा आहे. 

वर्ग २ च्या जमिनीचे लाभार्थीलाखोंडा बुद्रूक गावातील गट क्रमांक १३५ मधील जमिनीचे १९८८ मध्ये १३ लाभार्थीना वाटप करण्यात आले. त्यावेळी राधाकिसन घावट यांना १.९५ हेक्टर जमीन मिळाली. त्या जमिनीत तब्बल १५ गुंठय़ापेक्षाही अधिक क्षेत्राचे (४0 बाय ४0 मीटर) शेततळे असल्याची नोंद करून घेण्यात आली. 

गावात भीषण पाणीटंचाईसद्यस्थितीत गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. ग्रामस्थ व जनावरांना या तलावातील पाण्याचा आधार होता. त्यावर अतिक्रमण केल्याने तोही हिरावण्यात आला. अवैध अतिक्रमण तातडीने हटवण्यात यावे, सोबतच शासकीय जागेतील तलावाची खासगी शेततळे म्हणून नोंद करणार्‍या मंडळ अधिकारी, तलाठय़ावर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी रुपाली गोपनारायण यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. 

शेततळ्य़ाची नोंद घेण्यासाठी संबंधित यंत्रणेचे कामाबाबतचे कोणतेही प्रमाणपत्र आवश्यक आहे. घावट यांची नोंद जुनी आहे, त्यावेळी नोंद कशाच्या आधारे झाली, हे सांगता येत नाही. त्यांच्या शेतात शेततळ्य़ाची नोंद आहे. - पुरुषोत्तम गायवाडे, तलाठी, लाखोंडा बुद्रूक.