शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस टँकर ट्रकवर आदळला, २ ठार

By admin | Updated: December 5, 2014 00:09 IST

अकोल्यातील शिवणी टी-पॉइंटजवळील नवीन बायपासवरील पुलावर घडला अपघात.

अकोला : गॅस वाहून नेणार्‍या टँकरने ट्रकला जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास अकोल्यातील शिवणी टी-पॉइंटजवळील नवीन बायपासवरील पुलावर घडली. अपघातात ट्रक चालक व क्लीनरचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, टँकर चालक गंभीर जखमी झाला. ओआर १५ एन ६८२४ क्रमांकाचा गॅस टँकर रायपूर येथील प्लांटमध्ये एचपी कंपनीचा गॅस खाली करून शिवणीतील नवीन बायपासमार्गे मुंबईकडे भरधाव निघाला होता. टँकरने समोरून येणार्‍या एमएच ४0 वाय ४५७0 क्रमांकाच्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही ट्रकच्या कॅबिनचा अक्षरश: चुराडा झाला. नागपूरकडे माल घेऊन निघालेल्या एमएच ४0 वाय ४५७0 क्रमांकाच्या ट्रकमधील चालक व क्लीनर जागीच ठार झाले, तर गॅस टँकरचा शेषराव नामक चालक गंभीर जखमी झाला. ट्रकमधील दोन्ही मृतक कॅबिनमध्ये फसले होते. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. दोघांचेही मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आले. मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.  *टँकरमधून गॅस गळतीभीषण अपघात घडल्यानंतर टँकरमधून वायू गळती लागली होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अतिरिक्त कुमक आणि अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब बोलावून घेतला. गॅस गळतीचा आवाज मोठय़ाने येत असल्याने, पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळाहून सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगितले होते. मोबाइल फोन न वापरण्याचीही सूचना केली. अपघातग्रस्त टँकरच्या समोरच त्यांच्या एका सहकार्‍याचासुद्धा गॅस टँकर धावत होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळावर परतले. त्यांनीच पोलिसांना अपघातग्रस्त टँकरमधील गॅस रायपूर येथे खाली केलेला असून, उरलेल्या थोड्याफार गॅसची गळती होत असल्याचे सांगितल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.