शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

आश्चर्य आहे, अवघ्या चाेवीस तासांत निर्माण झाली कचरा साठवणुकीची समस्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 10:20 IST

Akola Municipal Corporation : कचरा साठवणुकीसाठी जागा शिल्लक नसल्याची काेल्हेकुई करीत कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांनी मनपासमाेर वाहनांच्या रांगा लावल्याचे बुधवारी दिसून आले.

ठळक मुद्देकचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या मनपासमाेर रांगात महापालिकेने ४ काेटींपेक्षा अधिक किमतीचे देयक अदा केले.
अकाेला : नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केला जाणारा कचरा केवळ एका बाजूला सारण्याचे काम करणारी पाेकलेन मशीन मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी बंद करण्याचा निर्णय घेताच सत्तापक्षातील पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. आयुक्तांच्या निर्णयाला अवघ्या चाेवीस तासांचा अवधी उलटत नाही ताेच डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा शिल्लक नसल्याची काेल्हेकुई करीत कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांनी मनपासमाेर वाहनांच्या रांगा लावल्याचे बुधवारी दिसून आले.मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच आयुक्त निमा अराेरा यांनी नियमबाह्य कामांना कदापि थारा दिला जाणार नसल्याचे सांगत पुढील वाटचाल स्पष्ट केली हाेती. मागील चार वर्षांपासून डम्पिंग ग्राउंडवर कचरा बाजूला सारण्याचे काम करणाऱ्या पाेकलेन मशीनच्या माेबदल्यात महापालिकेने ४ काेटींपेक्षा अधिक किमतीचे देयक अदा केले. अर्थात, मनपाच्या तिजाेरीची दिवसाढवळ्या लूट हाेत असल्याची बाब आयुक्त अराेरा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही मशीन बंद करून मनपाच्या मालकीची मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या सर्व बाबी महापालिकेच्या हिताच्या असल्या तरी त्याआडून दुकानदारी करणारे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांना हाताशी धरून बुधवारी डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याची ओरड करीत आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी धाव घेतली.मशीनमध्ये अचानक बिघाड?डम्पिंग ग्राउंडवरील एक पाेकलेन मशीन आयुक्तांनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परभणी येथील कंत्राटदाराच्या दुसऱ्या मशीनद्वारे कचरा बाजूला सारण्याचे काम सुरू करण्यात आले. दाेन दिवसांपूर्वी या पर्यायी मशीनमध्ये अचानक बिघाड झाल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम बंद पडले. हा दुग्धशर्करा याेग अचानक कसा जुळून आला, हे न समजण्याइतपत अकाेलेकर नक्कीच दूधखुळे नाहीत.पडद्यामागील सूत्रधार काेण?मागील काही दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या विलगीकरणाची जबाबदारी मे. परभणी अग्राेटेक प्रा. लि. कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीने कचऱ्याचे विलगीकरण केल्यानंतर त्याची पुढे कशी विल्हेवाट लावली, याबद्दल अनभिज्ञता असताना कंपनीच्या देयकासाठी कर्तव्यदक्षतेचा आव आणणाऱ्या एका स्थानिक अधिकाऱ्याने आयुक्तांकडे रेटा लावला. त्या देयकाला आयुक्तांनी बाजूला सारल्यानंतर अचानक कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे प्रशासनाला अस्थिर करणारा पडद्यामागील सूत्रधार काेण, असा सवाल उपस्थित झाला आहे.
टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला