शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

नायगावात उभारणार कचरा निर्मूलन प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:37 IST

अकोला : शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता,  साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नायगावमधील ‘डम् िपंग ग्राउंड’वरील एक एकर जागेवर कचरा निर्मूलन प्रकल्प  उभारण्यावर अखेर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले.

ठळक मुद्देमनपाची ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेला हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता,  साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नायगावमधील ‘डम् िपंग ग्राउंड’वरील एक एकर जागेवर कचरा निर्मूलन प्रकल्प  उभारण्यावर अखेर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले. तसा ठराव  सत्ताधारी भाजपाने मंजूर केला असून, आर्ट ऑफ लिव्हिंग संस् थेच्या माध्यमातून हा प्रकल्प महिनाभरात सुरू केला जाणार आहे. नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर  जागेवर ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यात आले. या ठिकाणी  साठवणूक होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे  कचर्‍याचे ढीग साचून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स् थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा  सपाटा लावल्यामुळे समस्येत भर पडली आहे. शहरातील कचरा  घेऊन जाणार्‍या मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे,  धमकाविण्यासह मारहाण करण्यापर्यंत अतिक्रमकांनी मजल  गाठली. एकूणच ही समस्या ध्यानात घेता नायगावातील ‘डम्पिंग  ग्राउंड’वरील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली  होती. कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा  प्रकल्प उभारण्यासाठी मनपाकडे अनेक खासगी कंपन्यांनी धाव  घेतली होती. परंतु कचरा निर्मूलनावर होणारा खर्च व ठोस तोडगा  निघत नसल्यामुळे मनपाने अशा कंपन्यांना नकार दिला. मध्यंतरी  बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने कमी खर्चात  कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याचा मानस  प्रशासनाकडे व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून संस्थेने डम्पिंग ग्राउंडवर प्रायोगिक  तत्त्वावर कचरा निर्मूलनाची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचे  सकारात्मक परिणाम पाहून महापालिकेने संस्थेला एक एकर  जागेवर प्रकल्प उभारण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 

मनपा उचलणार खर्च!नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवरील एक एकर जागेवर टिनाचे शेड,  विद्युत-पाणीपुरवठय़ाची व्यवस्था मनपाकडून केली जाणार आहे.  एक टन प्लास्टिक पिशव्यांमागे दोन हजार रुपये मनपाकडून अदा  केले जातील. यामुळे स्थानिक कचरा जमा करणार्‍यांना रोजगार  उपलब्ध होईल. उर्वरित कचर्‍याचे विलीगीकरण करून त्याचे  खत तयार केले जाणार आहे. 

कचर्‍याचा सर्वाधिक त्रास पावसाळ्य़ात होतो. घंटागाड्यांमुळे  शहरातून कचरा उचलण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर  प्रक्रिया करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला मंजुरी दिली.  येत्या दिवसांत प्रकल्प सुरू केला जाईल.-अजय लहाने, आयुक्त मनपा

ल्ल शहरात कचर्‍याची समस्या बिकट झाली आहे. कचर्‍यावर  प्रक्रिया करणे हाच उपाय असल्यामुळे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’  संस्थेकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यानुसार ठराव मंजूर केला. -विजय अग्रवाल, महापौर

टॅग्स :dumpingकचराMuncipal Corporationनगर पालिका