शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

अकोला : जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात ...

अकोला : जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ३१ टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीतील दोघेही जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे.

जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जयरामसिंह प्लाॅट येथील रहिवासी शुभम गजानन निमजे वय २१ वर्षे व कुणाल गणेश निमजे वय २१ वर्षे हे दोघे जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून जुने शहर पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. जुने शहर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक, तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली. मात्र, दोन्ही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी हा आदेश मंगळवारी दिला असून, टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी आवश्यक ती प्रक्रिया केली.