शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:31 IST

१५ एप्रिल २०१७ रोजी एका ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती.

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये २०१७ मध्ये एका कचरा वेचणाºया ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी पाशवी अत्याचार केला होता. या प्रकरणाचा अंतिम निकाल शुक्रवारी लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुरू आहे.त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये १५ एप्रिल २०१७ रोजी एका ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. या अत्याचाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळावरील त्या अल्पवयीन मुलीची परिस्थिती पाहून पोलिसांचे मनही विचलित झाले होते. सदर चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसताच पोलिसांनी तिला उचलून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात पोलिसांनी आधी एका संशयितास अटकही केली होती; मात्र पीडितेने दिलेल्या जुबानी रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपींची रेखाचित्र जारी केले होते. घटनेनंतर तीन दिवसांनी १८ एप्रिल २०१७ रोजी यातील आरोपी गोविंद परसराम साखरे, शेख मुस्तकीम, मोहसीन कुरेशी या तीन नराधमांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहात आहेत, तर या प्रकरणाच्या अंतिम युक्तिवादास १ आॅगस्ट २०१९ पासून प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुरुवात झाली होती. सध्या हे प्रकरण अंतिम टप्प्यात असून, शुक्रवारी प्रकरणात निकाल लागण्याची शक्यता आहे.-------------------------अशी घडली होती घटनासिटी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया एका खासगी शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणाºया चिमुकलीवर त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये तीन नराधमांनी पाशवी अत्याचार केला होता. ५० ते ५५ वयोगटातील इसम कॉम्प्लेक्सच्या बाहेर उभा होता. या इसमाने मुलीला तू दुसºया मजल्यावर जा, त्या ठिकाणी दोन युवक असून, ते तुला पैसे देतील, असे म्हणून तिला या कॉम्प्लेक्सच्या दुसºया मजल्यावर पाठविले होते. त्यामुळे ही मुलगी दुसºया मजल्यावर गेली होती. या ठिकाणी दुकाने नसल्याने वर्दळ नव्हती. यातील दोन युवकांनी तिच्यावर अत्याचार केला होता.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय