शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

रामदास पेठेतील गुन्हेगारांची टाेळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथील रहिवासी पिरू हसन बेनीवाले (वय ३५ वर्षे) व युसूफ चंदू बेनीवाले (वय ...

रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथील रहिवासी पिरू हसन बेनीवाले (वय ३५ वर्षे) व युसूफ चंदू बेनीवाले (वय ४२ वर्षे) हे दोघे जण जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून रामदास पेठ पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. रामदास पेठ पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक, तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली. मात्र, दोन्ही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश गुरुवारी दिला असून, टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास पेठ पाेलिसांनी केली.