शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बाल सल्लागार मंडळाचा अध्यक्ष गणेश बोरकर आरोपी

By admin | Updated: October 7, 2015 02:05 IST

एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील लैंगिक छळ प्रकरण.

अकोला: एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणामध्ये भरत राणे व मिलिंद मनवर या दोन शिक्षकांसोबतच बाल सल्लागार कल्याण मंडळाचा अध्यक्ष, तसेच पत्रकार प्रा. गणेश बोरकर आरोपी असल्याची माहिती उघड झाली आहे. खदान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हय़ामध्ये प्रा. गणेश बोरकर हे या प्रकरणामध्ये आरोपी असल्याचे समोर आल्याने बालकांचे संरक्षण करणार्‍या बाल सल्लागार मंडळाच्या अध्यक्षानेच विद्यार्थिनीचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारा संचालित असलेल्या अकोला आर्ट्स कॉर्मस अँण्ड सायन्स कॉलेज म्हणजेच एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या गालावर, पाठीवर भरत राणे नामक शिक्षक हात फिरवायचा. यासोबतच तिच्याशी लगट साधून अश्लील संभाषण करण्याचा प्रयत्न करीत होता. महागडे चॉकलेट देण्याचे आमिष, दुचाकी घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिला घरी बोलावण्यासाठी मागणी घालत होता. या प्रकाराची वाच्यता केल्यास परीक्षेत नापास करीन, तुझ्या आईला जिवे मारण्यात येईल, अशा प्रकारची धमकी देऊन या विद्यार्थिनीचा छळ सुरू केला होता. विद्यार्थिनीला छळ असहय़ झाल्यानंतर तिने या प्रकरणाची तक्रार शिक्षण संस्थेकडे करताच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मिलिंद सुदामराव मनवर आणि बाल सल्लागार कल्याण मंडळाचा अध्यक्ष प्रा. गणेश बोरकर या दोघांनी विद्यार्थिनीला पुन्हा धमक्या देऊन तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. बोरकर हा बालकांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या समितीवर असताना त्याने संरक्षण न करता विद्यार्थिनीचा छळ केला. त्यामुळे या पीडित विद्यार्थिनीने मोठे धाडस करून तीनही शिक्षकांविरुद्ध गुरुवारी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून खदान पोलिसांनी शिक्षक भरत राणे, मिलिंद मनवर व प्रा. गणेश बोरकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या लैंगिक छळ प्रकरणामध्ये बाल सल्लागार कल्याण मंडळाचा अध्यक्ष प्रा. गणेश बोरकर आरोपी असल्याचे खदान पोलिसांच्या दप्तरी नोंद करण्यात आली आहे. यामधील भरत राणे नामक शिक्षकास अटकपूर्व जामीन मिळाला असून, प्रा. गणेश बोरकर व मिलिंद मनवर या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.