शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींच्या सभेमुळे संचारले होते नवचैतन्य

By admin | Updated: October 2, 2016 02:17 IST

स्वातंत्र्यलढय़ात अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील ग्रामस्थांनी नोंदवला होता सहभाग.

राहुल सोनोने वाडेगाव(जि. अकोला), दि. 0१- भारताला ब्रिटिशांच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांना मार्गदर्शन केले होते. त्यांची एक सभा १९३३ मध्ये वाडेगावातही झाली होती. या सभेनंतर युवकांमध्ये नवचैतन्य संचारले होते. वाडेगावातील धनजीभाई ठक्कर हे मुंबईला महात्मा गांधी यांच्या भाषणाला उपस्थित होते. तेथील ते भाषण त्यांना पसंत पडले व तरुणांनो तुम्ही खेड्यामध्ये जा आणि स्वातंत्र्याचे वारे पसरवा, असा संदेश त्या भाषणातून महात्मा गांधींनी युवकांना दिला होता. महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद धनजीभाई ठक्कर यांनी प्रतिसाद दिला. वाडेगावातून ११0 लोकांनी स्वातंत्र्याचा लढा देताना शिक्षा भोगली होती. ही माहिती धनजीभाई ठक्कर यांनी महात्मा गांधींना सांगितली होती व महात्मा गांधी यांना वाडेगावात येण्यासाठी विनंती केली होती. १९३३ साली महात्मा गांधी यांची विदर्भाची बारडोली म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाडेगावात निगरुणा नदीच्या पात्रामध्ये रेतीच्या टेकडीवर मोठी सभा बोलविण्यात आली होती. त्यांच्या स्वागतासाठी वाडेगाववासीयांनी बेसिक शाळेपासून ते जागेश्‍वर मंदिराच्या मागच्या बाजूपर्यंंत केळीच्या बन लावल्या होत्या. त्यावेळी गांधीजींच्या सभेला परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या सभेचे अध्यक्ष धनजीभाई ठक्कर हे होते. या सभेत महात्मा गांधी यांनी हिंदीमधून भाषण दिले होते. या भाषणामुळे स्वातंत्र्य सैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले होते. गांधीजींनी यावेळी तुम्ही या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी व्हा, असे आवाहन युवकांना केले होते. अकोल्यातील नेते ब्रिजलाल बियाणीसुद्धा या सभेला उपस्थित होते. त्यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले होते. महात्मा गांधींनी या ठिकाणी ४५ मिनिटे भाषण केले होते. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचे गाव बारडोली असलेल्या गावामधून मोठय़ा प्रमाणात स्वातंत्र्य सैनिक तयार झाले होते. ती बारडोली म्हणजे देशाची बारडोली म्हणून ओळखली जायची म्हणून या वाडेगावला विदर्भाची बारडोली नाव दिले होते. ह्यस्वराज तो आनेवालाही है, अपने देश में अपना राज होना. ये लोग व्यापार करने के लिए अपने देश में आए है. स्वराज मिलने के लिए इसमें शामील हो आवोह्ण, असे आवाहन गांधीजींनी यावेळी केले होते.