आकोट : युवक व क्रीडा सेवा संचालनालय पुणे, म. रा. व क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त करून श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयाच्या खेळाडूंची बुलडाणा येथे होणार्या विभागीय स्तरावर निवड झाली आहे.विभागीय स्तरावर निवड झालेल्यांमध्ये इयत्ता दहावीचा अनुप बाळासाहेब चांदणे तर १७ वर्षे वयोगटात इयत्ता दहावीची दिपाली गजानन रेवस्कार व पल्लवी मनोहर तेलगोटे यांचा समावशे आहे. यशस्वी खेळाडूंना शारिरीक शिक्षण शिक्षक नीलेश झाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
गणगणे विद्यालयाचे खेळाडू विभागीय स्तरावर
By admin | Updated: August 21, 2014 19:36 IST