शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचन संचाचा निधी रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:35 IST

अकोला : सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाºया ठिबक, तुषार संचाचे ४०० कोटींच्यावर अनुदान रखडले असून, यावर्षी २ लाख ३९ हजार ७३९ शेतकºयांनी या योजनेसाठी आॅनलाइन नोंदणी केली.

अकोला : सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाºया ठिबक, तुषार संचाचे ४०० कोटींच्यावर अनुदान रखडले असून, यावर्षी २ लाख ३९ हजार ७३९ शेतकºयांनी या योजनेसाठी आॅनलाइन नोंदणी केली. मार्चअखेर प्रत्यक्षात ५४ हजार ६५६ शेतकºयांच्याच अर्जाची तपासणी करण्यात आली.शेतकºयांनी सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शेतकºयांना अनुदान दिले जाते; परंतु या योजनेचे अनुदान मिळण्यासाठी शेतकºयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर्षी या योजनेसाठी जवळपास ६५० कोेटी रुपये मंजूर करण्यात आले आहे; परंतु अर्जाची तपासणी बघता आतापर्यंत केवळ दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचेच अनुदान शेतकºयांना देण्यात आले.योजना सुरू झाली तेव्हा शेतकरी संच खरेदी करायचे. या संचाची रक्कम कंपनीच्या नावाने निघायची. आता मात्र यात बदल करण्यात आला असून, अनुदानाची रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ज्या शेतकºयांना संच खरेदीची पूर्वसंमती देण्यात येते, ते शेतकरी सूक्ष्म सिंचनासाठी लागणारे पाइप, तुषार, ठिबक व इतर संच करू न शेतकरी गुंतवणूक करतात. म्हणूनच त्यांना अनुदान वेळेवर मिळावे, अशी अपेक्षा आहे.दरम्यान, पावसाची अनिश्चितता बघता, शेतकºयांचा कल सूक्ष्म सिंचन योजनेकडे वाढला असून, मागील तीन-चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी या योजनेसाठीच्या अर्जाची मागणी वाढल्याचे चित्र आहे. इतर पिकांसह शेतकरी आता फळझाडे, कापूस पिकालाही ठिबक, तुषार संचाद्वारे सिंचन करीत आहेत.

- सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत अकोला तालुक्यातील ४८२ शेतकºयांनी ठिबक, तुषार संचासाठी अर्ज केले होते. त्यातील २७२ शेतकºयांना अनुदान देण्यात आले.नरेंद्र शास्त्री, कृषी अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती