शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानेच केला मित्राचा खून!

By admin | Updated: September 24, 2016 03:13 IST

अकोल्यातील घटना; दारुच्या नशेत क्षुल्लक कारणावरून झाला होता वाद.

अकोला, दि. २३- मरगट परिसरातील इक्बाल कॉलनी येथील रहिवासी २८ वर्षीय युवकाची त्याच्याच मित्राने फावड्याचा दांडा डोक्यात घालून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हत्या केल्यानंतर आरोपी रामदास पेठ पोलिसांना शरण आला असून, दारुच्या नशेत हे हत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा रजेवर गेल्यानंतर २४ तासातच शहरात हे दुसरे हत्याकांड घडले.इक्बाल कॉलनी येथील रहिवासी शेख मुशीर शेख नासीर (२८) व त्याचा मित्र शेख राजू शेख मुस्तफा (२८) हे दोघे मजुरीचे काम करतात. शुक्रवारी सकाळी दोघेही कामावर सोबत गेले, त्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले. शुक्रवारी दुपारपासून सुरु झालेले वाद सायंकाळपर्यंत सुरूच होते. या किरकोळ वादातून शेख राजू शेख मुस्तफा संतापल्याने त्याने शेख मुशीर शेख नासीर हा त्याच्या घरी खाटेवर झोपलेला असताना डोक्यात फावड्याच्या लाकडी दांड्याने हल्ला चढविला. यामध्ये शेख मुशीर शेख नासीर याचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीलाही या हाणामारीत किरकोळ दुखापत झाली. शेख मुशीर याची हत्या केल्यानंतर आरोपी राजू हा थेट रामदास पेठ पोलिसांना शरण आला. राजूला त्याच्या आईनेच पोलीस स्टेशनमध्ये आणल्याची माहिती आहे. गुरुवारी सायंकाळी जमील अली नजरत अली याची गांधी रोडवरील चौपाटीवर हत्या करण्यात आली होती, त्यानंतर २४ तासाच्या आतच शेख मुशीर याची हत्या झाली. या हत्येमुळे इक्बाल कॉलनीत एकच खळबळ उडाल्याने मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, रामदास पेठचे ठाणेदार सुभाष माकोडे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.