शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीग्रस्तांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीची वेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 18:22 IST

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे.

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १० सप्टेंबर रोजी पुन्हा निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांसाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त १ लाख ४५ हजार कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना तीन हप्त्यात मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार मदत वाटपाचा पहिला व दुसरा हप्ता मिळून जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ९० कोटी ३४ लाख रुपयांचा मदत निधी शासनामार्फत प्राप्त झाला होता. उपलब्ध मदत निधी बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित तिसºया व अंतिम हप्त्यातील मदत जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना वाटप करण्यासाठी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने मदत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला; मदत निधी प्राप्त झाला नसल्याने, पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १० सप्टेंबर रोजी बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.परंतू, जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी अद्यापही ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आल्याचे चित्र आहे.निधी केव्हा प्राप्त होणार?बोंडअळीग्रस्त शेतकºयांना वाटप करावयाच्या तिसºया व अंतीम हप्त्याचा निधी अद्याप शासनामार्फत प्राप्त झाला नसल्याने, मदत निधी केव्हा प्राप्त होणार, याबाबत मदतीच्या लाभापासून वंचीत असलेल्या जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती