शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर ओळख झालेल्या युवतीवर वारंवार अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST

अमरावती : फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रेमसूत जुळले. लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीला अमरावती, शेगाव, नागपूर व पचमढी येथे ...

अमरावती : फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रेमसूत जुळले. लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीला अमरावती, शेगाव, नागपूर व पचमढी येथे नेऊन शारीरिक अत्याचार केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील दस्तूनगर येथे १३ मार्च २०१७ ते २ डिसेंबर २०२० दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविला.

पोलीससूत्रानुसार, निखिल राजेश सहारे (२६, रा. फ्रेजरपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर सुनावला आहे. आरोपीची युवतीशी फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर प्रेमसंबंध जुळले. सेवाग्राम रेल्वे स्टेशन येथे दोघांची भेट झाली. ते दोघेही दुचाकीने दस्तूरनगरातील आरोपीच्या मित्राच्या रूमवर आले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या रूमवरच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर शेगाव येथे एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सन २०१७ मध्ये आरोपीच्या आतेभावाचे नागपूर येथे लग्न असल्याने तेथे आल्यानंतरसुद्धा फ्रेन्ड्स कॉलनीतील एका मित्राच्या रूमवर तिला नेऊन आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सन २०१९ मध्ये तिला मध्य प्रदेशातील पचमढी येथील लॉजवर नेऊन अत्याचार केला. तसेच ७ व ८ सप्टेंबरला आरोपी हा युवतीच्या घरी आला. तेव्हाही त्याने अत्याचार केला. यानंतर मात्र युवतीने आरोपीला २ डिसेंबरला लग्नाची गळ घातली असता, त्याने युवतीला थापडाबुक्क्यांनी मारहाण करून लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित युवतीने पोलिसांत धाव घेतली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ३७६(२), (एन)३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.