शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

स्वातंत्र्यदिनी अब्दूल कलाम यांचे १0१ फूट तैलचित्र उभारणार

By admin | Updated: August 14, 2015 23:11 IST

अकोल्यातील नॅशनल इंटिग्रिटी मिशनचा उपक्रम.

अकोला : सर्वात मोठा राष्ट्रध्वज तयार करून दोन वर्षांपूर्वी ह्यलिमका बुकह्णमध्ये स्थान मिळविणार्‍या अकोल्यातील 'नॅशनल इंटिग्रिटी मिशन' या सेवाभावी संस्थेने भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनापासून अकोला शहरात अभिनव उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला. मनामनांत राष्ट्रभक्तीची मशाल जागृत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून स्थापित केलेल्या या संस्थेच्यावतीने यावेळी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे १0१ फूट उंचीचे तैलचित्र उभारण्यात येणार आहे. 'नॅशनल इंटिग्रिटी मिशन' संस्थेने १९९९ साली रॅलीच्या माध्यमातून एक कि.मी. पेक्षाही लांब कापडी राष्ट्रध्वजाची तिरंगी पट्टी शहरातील प्रमुख मार्गांंवरून फिरविली. ती पकडण्यासाठी हजारो अकोलेकर सरसावले होते. २00६ मध्ये चिकनगुनीया या आजाराचा उद्रेक वाढल्याने संस्थेच्यावतीने तब्बल ३.५ लाख रुपये किमतीची औषधे शहरातील गरजू रुग्णांना वितरित करण्यात आली होती. २0१३ मध्ये संस्थेने वाराणसी येथील भव्य राष्ट्रध्वज निर्मितीचा विक्रम मोडला. मेहेरबानू महाविद्यालयात हजारो मीटर कापडाचा (२१६.५४ बाय १४४.३६ फूट आकाराचा) तिरंगा राष्ट्रध्वजाच तयार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी तो राष्ट्रध्वज मेहेरबानू महाविद्यालयातून क्रिकेट क्लब मैदानावर नेत असताना देशाभिमान जागृत झालेले हजारो अकोलेकर त्यास उचलून धरण्यासाठी सरसावले होते. 'लिमका बुक' मध्ये या उपक्रमाची नोंद झाली होती. ही संस्था यंदाच्या स्वातंत्र्य दिनी डॉ. कलाम यांचे १0१ फूट उंच तैलचित्र उभारणार आहे.*अभिनव उपक्रमांची धुरा यांच्या खांद्यावर.नॅशनल इंटिग्रिटी मिशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश जाधव यांच्यासह बी.एस. देशमुख, प्रा. डॉ. संतोष हुशे, गणेश कटारे, राजू बगथरिया, जयशन गुडधे, अभिषेक कोकाटे, राजेश भंसाली, जमीलभाई, सादीकभाई, इलियास गौरवे, अँड. रविंद्र पोटे, अँड. समीर पाटील, अँड. राजनारायण मिश्रा, सै. नबील, पराग कांबळे, पंकज कांबळे, अभय दांडगे, संदेश इंगळे, शेखर सायरे, संजय गावंडे, सचिन गिरी, मनोज शहा, गुड्ड राठोड, मयूर बोंडे, सदाशिवखान पठाण, प्रकाश तायडे आदींसह संस्थेचे इतर कार्यकर्ते दरवर्षी स्वातंत्र्य दिनी आयोजित केल्या जाणार्‍या अभिनव उपक्रमाची धुरा सांभाळतात.