शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास माेफत वीज; मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त; ९० सिंचन प्रकल्प मार्गी

By आशीष गावंडे | Updated: June 11, 2025 19:52 IST

बळीराजा जलसंजीवनी याेजनेतून विदर्भातील रखडलेले ९० सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ होऊन शेती उत्पादनात सुधारणा होईल.

- आशिष गावंडे

अकाेला: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज पुरवठा केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, या योजनेद्वारे डिसेंबर २०२६ पर्यंत १६,००० मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बळीराजा जलसंजीवनी याेजनेतून विदर्भातील रखडलेले ९० सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ होऊन शेती उत्पादनात सुधारणा होईल.

व्यासपिठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कामगार मंत्री तथा अकाेला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर आदी उपस्थित हाेते. अकोल्यात ११ जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते २,६०० कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या १९ विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. यादरम्यान, भाजपच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ‘विकास संवाद सभे’ चे आयाेजन करण्यात आले हाेते. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले की, २०२७ पर्यंत विदर्भाचा अनुशेष संपेल, असा आम्हाला विश्वास आहे. महायुती सरकारच्या धोरणांमुळे विदर्भातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती होत असून, भविष्यातील विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

हा विजय खुर्च्या ताेडण्यासाठी नाही!राज्यात दणक्यात महायुतीचे सरकार आले. विधानसभा निवडणुकीतील हा विजय खुर्च्या ताेडण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी मिळाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यापुढे शासकीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा नव्हे तर १५० दिवसांसाठी आराखडा तयार केला जाइल,असे त्यांनी सांगितले.यापुढे शेतीसाठी ‘एआय’चा वापरशेतीमधून कमी खर्चात जास्त उत्पादकता मिळवण्यासाठी भविष्यात ‘एआय’चा वापर केला जाइल. किड प्रतिबंधक उपाय, खतांचा वापर करताना ‘एआय’ची मदत घेतली जाइल. आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी शासनाकडून ठाेस पाऊले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस