पातूर : तालुक्यातील खानापूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा गुरुवार, ११ मे रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली.प्राप्त माहितीनुसार, बबन लक्ष्मणराव वैरागडे (५८) हे खानापूर शेतशिवारात आपल्या स्वत:च्या शेतात इतर मजुरांसह दगड उचलण्याचे काम करीत होते. यादरम्यान त्यांना उन्हाचा जबर फटका बसला व त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने उपचाराकरिता पातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुली व दोन मुले आहेत. उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. सध्या पारा ४४.६ अंशांच्यावर चढला आहे.
खानापुरात अल्पभूधारक शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू
By admin | Updated: May 14, 2017 04:15 IST