शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तूर विक्रीत फसवणूक; दोन व्यापाऱ्यांना अटक

By admin | Updated: June 29, 2017 00:58 IST

नाफेडला एकाच सात-बारावर तूर विकून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार तेल्हारा येथील सहायक उपनिबंधक राजुसिंग राठोड यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : नाफेडच्यावतीने केलेल्या तूर खरेदीत हिवरखेड येथील व्यापारी व अडत्यांनी अकोट व तेल्हारा येथे नाफेडला एकाच सात-बारावर तूर विकून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार तेल्हारा येथील सहायक उपनिबंधक राजुसिंग राठोड यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली. या पोलिसांनी याप्रकरणात तीन व्यापाऱ्यांविरुद्ध भादंविच्या ४२० व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन व्यापाऱ्यांना अटक केली आहे.नाफेडच्या तूर खरेदी झालेल्या गैरप्रकाराची शासनाने चौकशी सुरू केली. या चौकशीत हिवरखेड येथील व्यापारी सुनील चिरंजीलाल बजाज व प्रदीप चिरंजीलाल बजाज या दोन भावांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची फसवणूक करून एकाच सात-बारावर तेल्हारा व अकोट येथे ३०० क्विंटलच्या जवळपास तूर विकल्याचे निष्पन्न झाले, तसेच हिवरखेड येथीलच गोपाल चांडक यांनीही नाफेडला तूर विकण्याप्रकरणी शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तेल्हारा येथील सहायक उपनिबंधक राजुसिंग राठोड यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये उपरोक्त तिन्ही व्यापाऱ्यांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून याप्रकरणी प्रदीप बजाज व सुनील बजाज या दोन्ही आरोपींना तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणपत गवळी, पीएसआय नागोराव भांगे यांनी अटक केली. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत. याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांना अटक झाल्याने आता नाफेडला तूर विकणाऱ्या अजून काही व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.