शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुंडगाव शिवारात दरवळणार ओव्याचा सुगंध

By admin | Updated: August 11, 2014 00:54 IST

मुंडगाव परिसरातील शेतकर्‍यांचा कल आता ओवा पिकाकडे असल्याचे दिसून येत आहे.

मुंडगाव: पावसाच्या लहरीपणामुळे मूग, उडीद पेरता आला नाही व सोयाबीनच्या पेरण्या उलटल्या. त्यामुळे खारपाणपट्टय़ातील मुंडगाव परिसरातील शेतकर्‍यांचा कल आता ओवा पिकाकडे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंडगाव शिवारात ओव्याचा सुगंध दरवळणार आहे.आकोट तालुक्यातील मुंडगाव हे ओवा या मसाला पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे; परंतु गत दोन ते तीन वर्षांपासून योग्य भाव व विक्रीसाठी निश्‍चित बाजारपेठ नसल्यामुळे या पिकाचा पेरा घटला होता. यावर्षी पावसाळय़ाचा जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस आला. तोपर्यंत मूग व उडिदाच्या पेरणीची वेळ निघून गेली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचा पेरा केला. तथापि, पावसाचा अनियमितपणा, उगवण शक्तीत घट व वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीनच्या पेरण्या उलटल्या. आता पुन्हा सोयाबीनची लागवड करणे परवडणारे नसल्यामुळे परिसरातील शेतकरी ओवा या मसाला पिकाकडे वळत आहेत. ओवा हे कमी पावसात येणारे पीक आहे. इतर पिकांच्या तुलनेत भावही बरे असल्यामुळे शेतकरी आता ओवा पीक पेरण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा मुंडगाव शेत शिवारात ओव्याचा सुगंध दरवळणार, एवढे मात्र निश्‍चित आहे. ओवा पिकाच्या लागवडीसाठी हेक्टरी अंदाजे १२ हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो. या पिकाला वन्य प्राण्यांचाही उपद्रव नसतो. ऑगस्टमध्ये पेरणी केल्यानंतर साधारणत: जानेवारी महिन्यात हे पीक काढणीला येते.एक हेक्टर क्षेत्रात अंदाजे १0 क्विंटल ओव्याचे उत्पन्न होते. उत्पादन खर्च अतिशय कमी असलेल्या पिकास योग्य बाजारभाव मिळाल्यास खारपाणपट्टय़ातील शेतकर्‍यांसाठी ते वरदान ठरून शकते.