शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चौथीच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाला नवे रूप!

By admin | Updated: December 28, 2014 23:59 IST

२0१५ पासून अंमलबजावणी : शिष्यवृत्ती परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार.

ब्रह्मनंद जाधव/मेहकर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. इयत्ता चौथीचा नवा अभ्यासक्रम सन २0१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून अमलात आला आहे. या अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता चौथीची पूर्व मध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व विमुक्त जाती-जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. नव्या अभ्यासक्रमात परिसर अभ्यास एकमध्ये सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे. तर परिसर अभ्यास दोनमध्ये एकत्रित अभ्यासक्रम असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपर क्रमांक दोनमध्ये गणितासह परिसर अभ्यास एक अंतभरूत करण्यात आला आहे. तसेच पेपर क्रमांक दोनमध्ये बुद्धिमत्ता चाचणीसह परिसर अभ्यास दोन अंतभरूत करण्यात आला आहे. मराठी माध्यमासह उर्दू, हिंदी, गुजराती, तेलुगु, सिंधी व कन्नड या सात माध्यमांचे पेपर क्रमांक एकचे विषयनिहाय गुणनियोजन समान असणार आहे. इंग्रजी माध्यमाचे गुणनियोजन स्वतंत्रपणे देण्यात आले आहे. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलुगु, सिंधी व कन्नड या आठही माध्यमांचे पेपर क्रमांक दोन व तीनचे विषयनिहाय गुणनियोजन समान राहणार आहे. मराठी व इंग्रजी माध्यमाचे पेपर क्रमांक एक, दोन व तीनचे क्षेत्रनिहाय बदल नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरसूची यांचे अंतिम आराखडे स्वतंत्रपणे परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. *गुण विभागणीचा अंतिम आराखडा तयारराज्य शैक्षणिक संधोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अभ्यासक्रमावर आधारित विषययोजना, घटकनिहाय गुण विभागणीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. मराठी माध्यमाप्रमाणेच उर्दू, हिंदी, गुजराती, तेलुगु, सिंधी व कन्नड या माध्यमांचेही क्षेत्रनिहाय व घटकनिहाय गुणविभागणी, प्रश्नपत्रिकेचा नमुना व उत्तरसूची राहणार आहे.