शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेचे चार प्रस्ताव रद्द

By admin | Updated: January 19, 2017 02:51 IST

दहा प्रस्ताव परत; मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या खर्चात कपातीचे आदेश.

अकोला, दि. १८- ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाची कायमस्वरूपी सोय म्हणून मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्हय़ातून निवड केलेल्या व निधी मंजूर असलेल्या १६ पैकी दहा योजनांचे अंदाजपत्रक शासनाने बुधवारी नामंजूर केले. त्या योजनांच्या खर्चात कपात करून नव्याने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले, तर रद्द केलेल्या चार योजनांसाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. सोबतच उर्वरित दोन गावांचे प्रस्तावही आता सादर केले जाणार आहेत. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम २0१६-१७ ते २0१९-२0 या वर्षात राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यात नव्याने घेण्यात येणार्‍या एकूण १00३ योजनांपैकी ९७२ स्वतंत्र योजना आहेत, तर ३१ योजना प्रादेशिक आहेत. त्यामध्ये अकोला जिल्हय़ातील १६ योजनांचे प्रस्ताव मंजूर आहेत. त्यासाठी शासनाने निधी खर्चाची र्मयादा ठरवून दिली. त्या र्मयादेत प्रस्ताव सादर करण्याचे मे २0१६ मध्येच निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेने दहा योजनांसाठी ११ कोटी ६१ लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव सादर केले. त्याची पडताळणी बुधवारी राज्याच्या पाणीपुरवठा विभागात करण्यात आली. त्यामध्ये ते सर्व प्रस्ताव परत करण्यात आले. त्यामुळे ते नव्याने सादर करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर आली आहे.चार योजनांचे प्रस्ताव आधीच रद्द शासनाने मंजूर केलेल्या १६ पैकी चार गावांचे प्रस्ताव आधीच रद्द झाले आहेत. त्यामध्ये कानशिवणी, कोळंबी व वाशिंबा या गावातील स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत, तर तपलाबादचा समावेश महापालिकेत झाल्याने ते रद्द झाले. त्याऐवजी आता चिखलगाव, खडकी-टाकळी, कुरणखेड, चांदूर या गावांचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. घरगुती नळांचा खर्च कपातीसाठी परत शासन निर्णयात आधी घरगुती नळ योजनेचा खर्च जोडण्याचे आदेश होते. तो खर्च कमी करण्याचे आता बजावण्यात आले. योजनांचे प्रशासकीय अंदाजपत्रक दहा टक्के अधिक खर्चाचे तयार केले. ते कमी करा. हस्तांतरणापूर्वी योजना तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी कंत्राटदाराला लागणारा खर्च अंदाजपत्रकात वाढवा, तशी दुरुस्ती करूनच प्रस्ताव सादर करण्याचे बजावण्यात आले आहे. या योजनांचे प्रस्ताव आले परतशासनाने जिल्हा परिषदेला परत केलेल्या प्रस्तावांमध्ये चान्नी, मनब्दा, गायगाव, दगडपारवा, सारकिन्ही, सोनाळा, अन्वी, पुनोती, गोरेगाव बुद्रूक, कोठारी या गावांचा समावेश आहे. या गावातील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांसाठी ११ कोटी ६१ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.