शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: September 25, 2014 02:50 IST

अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा क्षेत्रात ६२ उमेदवारांना १२१ अर्जांचे वाटप.

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम आणि बाळापूर या तीन मतदारसंघात चार उमेदवारांचे पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, पाचही मतदारसंघात ६२ इच्छुक उमेदवारांना १२१ उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवार, २0 सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यामध्ये अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी अकोला पूर्व मतदारसंघातून भारिप-बमसंचे विद्यमान आमदार हरिदास भदे, अकोला पश्‍चिम मतदारसंघातून आंबेडकरवादी रि पब्लिकन पार्टीचे डॉ. धनंजय नालट, अपक्ष संतोष ढोले, बाळापूर मतदारसंघातून अपक्ष प्रदीप देशमुख इत्यादी चार उमेदवारांकडून पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये नालट यांनी एक अर्ज आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीच्या नावाने तर दुसरा अर्ज प्रहार संघटनेच्या नावाने असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी पाचही मतदारसंघात ६२ उमेदवारांना १२१ उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी मंगळवारी जिल्ह्यात अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष गौतम कंकाळ या एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल झाला, तर पाचही मतदारसंघात ७0 उमेदवारांना १३३ उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले होते.