शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

महान भागविणार चार महिने तहान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:00 AM

यंदा पावसाने मारलेली दडी आणि महान  धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता शहरावरील  जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणात  केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून, या तून अकोलेकरांना चार महिन्यापर्यंत पाणीपुरवठा केला  जाऊ शकतो. शहरावरील संभाव्य जलसंकट पाहता  नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून काटकसरीने वापर  करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देशहरावरील जलसंकटाचे ढग गडद महान धरणात केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा  शिल्लक

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यंदा पावसाने मारलेली दडी आणि महान  धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता शहरावरील  जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणात  केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून, या तून अकोलेकरांना चार महिन्यापर्यंत पाणीपुरवठा केला  जाऊ शकतो. शहरावरील संभाव्य जलसंकट पाहता  नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून काटकसरीने वापर  करण्याची गरज निर्माण झाली आहे. अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून  पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाण्यावर महान ये थील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया केल्यानंतर ९00  व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरातील  जलकुंभांमध्ये पाण्याची साठवणूक केली जाते. यंदा मात्र  जलसंकटाची दाट शक्यता दिसून येत आहे. जून महिन्यापासून ते आजपर्यंत पावसाच्या तीन  महिन्यांच्या कालावधीत अद्यापही समाधानकारक  पाऊस न झाल्यामुळे धरणातील जलसाठय़ात किंचितही  वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. आगामी दिवसांत  पाऊस आल्यास जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, लघू  प्रकल्पातील जलसाठय़ात कि ती वाढ होईल, याबाबत  साशंकता आहे. आजरोजी महान धरणात १५.४२ टक्के  जलसाठा शिल्लक आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पावसाचा अंदाज पाह ता महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने पाणी पुरवठय़ात कपात करून नागरिकांना दर आठव्या दिवशी  पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन वेळापत्रक तयार केले  असून, त्यानुसार पाणीपुरवठा केला जात आहे. या वेळा पत्रकानुसार आणि उपलब्ध जलसाठा पाहता  अकोलेकरांना चार महिन्यांपर्यंत पाणीपुरवठा करणे  महापालिकेला शक्य आहे. त्यानंतर पर्यायी स्त्रोतांचा  अवलंब करावा लागणार आहे. महापालिका पर्यायी स्रोतांची पाहणी करीत असून हे स्रो तही अपुर्‍या पावसामुळे पुरेसे ठरतील की नाही, ही  शंकाच आहे. अशा स्थितीमध्ये अकोलेकरांनीच  पाण्याचा काटकसरीचा मार्ग आतापासून स्वीकारला  पाहिजे. 

नागरिकांनो, परतीचा पाऊस साठवा!रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर देण्याची गरजअपुर्‍या पावसामुळे यावर्षी पावसाळा संपण्याच्या आधीच  पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. अकोला शहरात  आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला  असून, केवळ डिसेंबरपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा  आहे. मूर्तिजापूरसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था शोधली  जात आहे, तर खांबोरा योजनेवरील ६१ गावांसाठी  टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही स्थिती पुढील  संकटाची चाहूल देणारी आहे. पावसाचे काहीच दिवस  शिल्लक असून, वरुणराजाने कृपा केली, तर जाता-जा ता सर्व धरणे भरून जातील, एवढाही पाऊस येऊ शक तो; मात्र केवळ याच आशेवर थांबून चालणार नाही. पर तीचा पाऊस पडेल व वाहून जाईल, असे होता कामा  नये. यासाठी अकोलेकरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर  दिला पाहिजे. परतीचा पाऊस नक्कीच हजेरी लावेल,  असे अंदाज हवामान विभागाने दिले आहेत, त्यामुळे या  पावसाचे पाणी साठवता आले, तर किमान भूजल पा तळी वाढण्यास मदत होऊन पाणीटंचाईचे संकट  काहीअंशी कमी होऊ शकते. रेन वॉटर हार्वेस्टिंगसोब तच विंधन विहीर पुनर्भरणाचाही उपक्रम राबविला  पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरातील बोअरची पातळी  वाढेल, ते बोअर पुन्हा रिचार्ज होईल, एवढी काळजी तरी  परतीच्या पावसात घेतली, तर त्या कुटुंबापुरता पाण्याचा  प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.

संभाव्य पाणीटंचाईचे सावट लक्षात घेऊन पर्यायी  जलस्त्रोतांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी जल प्रदाय विभागाची यंत्रणा आतापासूनच कामाला लागली  आहे. प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असले तरी  पाण्याच्या काटकसरीसाठी अकोलेकरांनी साथ देणे अ पेक्षित आहे.- अजय लहाने, आयुक्त, मनपा