शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे कोटींच्या देयकावर चारशे कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 14:48 IST

विशेष म्हणजे, विकास कामांसाठी मिळणारा निधी पाणी पुरवठ्यावर खर्च करण्याची वेळ जिल्हा परिषदांना आली आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्याच्या मोबदल्यात राज्यातील ८ जिल्हा परिषदा व २८ जिल्हा परिषदांतील ग्रामपंचायतींकडे असलेली मूळ थकबाकी २०७ कोटींच्या रकमेवर विलंब आकारापोटी ३९९ कोटी रुपये वसुलीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जानेवारी २०१९ पासून पाठपुरावा सुरू केला. त्याचवेळी ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची वसुलीच नसल्याने ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या मुद्रांक शुल्क अनुदानातून ही रक्कम वळती केली जात आहे. विशेष म्हणजे, विकास कामांसाठी मिळणारा निधी पाणी पुरवठ्यावर खर्च करण्याची वेळ जिल्हा परिषदांना आली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राज्यातील अनेक जिल्हा परिषदा व त्यांतर्गत ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणाºया योजना चालविल्या जात आहेत. त्या योजनांतून पुरवठा करणे, देखभाल व दुरुस्तीचे कामही प्राधिकरणाकडून केले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदांकडून मोबदल्याची रक्कम प्राधिकरणाला द्यावी लागते; मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींची वसुली अत्यल्प आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. २८ जिल्हा परिषदांतील ग्रामपंचायतींकडे २०७ कोटी ७ लाख ३० हजार ४३७ रुपये थकीत असल्याचे वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाच्या बैठकीत आॅक्टोबर २०१८ मध्ये पुढे आले. त्यावेळी या थकीत रकमवेर दंडाची रक्कम म्हणून ३९९ कोटी ५९ लाख ४५ हजार १३८ रुपये असल्याचेही ठरविण्यात आले. ही रक्कम संंबंधित जिल्हा परिषदांनी भरण्याचेही त्यावेळी कबूल केले. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने डिसेंबर २०१८ मध्येच सर्व जिल्हा परिषदांना रक्कम भरण्याचे कळविले. २३ जानेवारी २०१९ रोजी अकोला जिल्हा परिषदेला प्राप्त पत्रानुसार कार्यवाहीला सुरूवातही झाली. तरीही गत वर्षभरात ग्रामपंचायतींची वसुलीच नसल्याने पाणी पुरवठ्याची थकबाकी आता मुद्रांक शुल्क अनुदानातून अदा केली जात आहे. त्यासाठी विकास कामांचाही बळी दिला जात आहे.पाणीपट्टी थकीत असलेल्या जिल्हा परिषदाअकोला-१३.८८ कोटी, रायगड-२.९७ कोटी, धुळे-१६.७८, हिंगोली-१.६५, परभणी-०.५३, यवतमाळ-०.७९, औरंगाबाद-०.१०, बीड-०.६८, लातूर-०.८६, ठाणे-९.८५, जळगाव-३८.१५, नाशिक-०.१०, भंडारा-८.८, चंद्रपूर-०.२३, नागपूर-९.४९, कोल्हापूर- ५०.७०, पुणे ४.६३, सांगली-०.६२, सातारा-३.९९ कोटी.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद